AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar | शरद पवारांचा आज अमरावती दौरा, पोलीस आयुक्तांकडून परिसराची पाहणी, दौऱ्यासाठी 350 पोलीस तैनात

अमरावतीत आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावती विभागाच्या सवांद मेळाव्याला शरद पवार करणार मार्गदर्शन करतील. शहरात ठिकठिकाणी शरद पवार यांच्या स्वागताचे पोस्टर लागलेत. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहील आहे.

Sharad Pawar | शरद पवारांचा आज अमरावती दौरा, पोलीस आयुक्तांकडून परिसराची पाहणी, दौऱ्यासाठी 350 पोलीस तैनात
नागपूर : अनिल देशमुख कारागृहात असले, तर शरद पवार यांच्या स्वागताचे पोस्टर नागपूर विमानतळावर लागले आहेत. Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 10, 2022 | 9:33 AM
Share

अमरावती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे हेविवेट नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आज अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांच्या घरावरील झालेल्या हल्ल्यानंतर हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने 350 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक, PSI यांच्यासह पोलीस हवालदार यांचा समावेश असणार आहे. यावेळी सांस्कृतिक भवन परिसराची पोलीस आयुक्त आरती सिंह (Commissioner of Police Aarti Singh) यांच्याकडून पाहणी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलीस घेताना दिसत आहे.

संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करणार

मंत्री राजेंद्र शिंगणे, मंत्री सुनील केदार हेही अमरावतीच्या दौऱ्यावर येत आहेत. शरद पवारांच्या हस्ते आज शिवाजी संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व सभागृहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अमरावतीत दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावती विभागाच्या सवांद मेळाव्याला शरद पवार करणार मार्गदर्शन करतील. शहरात ठिकठिकाणी शरद पवार यांच्या स्वागताचे पोस्टर लागलेत. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहील आहे.

अमरावती शहरात रूट मार्च

अमरावती शहरात शेकडो पोलिसांनी काल रुट मार्च काढला. रामनवमी, रमजान आणि शरद पवारांच्या दौऱ्यानिमित्त पोलीस अलर्ट आहेत. अमरावतीच्या इतवारा, जवाहरगेट आदी भागांतून रुट मार्च काढण्यात आला. आज अमरावतीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे.

नागपुरातही सुरक्षेत वाढ

नागपुरात आज शरद पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नागपूर पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली. शरद पवार आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी दहा वाजता शरद पवार यांचं नागपूर विमानतळावर आगमन होईल. नागपूर विमानतळावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांचा सत्कार करणार आहेत. शरद पवार यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावर असणार अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

Devendra Bhuyar | डॉक्टर अनिल बोंडे 3-4 वाजतानंतर शुद्धीवर नसतात; अमरावतीत देवेंद्र भुयार यांची खोचट टीका

Amravati NCP | राष्ट्रवादीचा उद्या अमरावतीत मेळावा, शरद पवार उपस्थित राहणार, देवेंद्र भुयार राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Video Nagpur Police | आमदार आशिष जैसवाल यांचे पोलिसांवर गंभीर आरोप; वाहतूक पोलिसांना सुनावले

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.