एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना, शाळेत पोहचण्यासाठी चक्क पालकमंत्र्यांच्या गाडीने प्रवास…

राज्य परिवहन महामंडळ (ST) राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एसटी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच बस डेपोचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. बसस्थानक परिसरात शुकशुकाट बघायला मिळतोय.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना, शाळेत पोहचण्यासाठी चक्क पालकमंत्र्यांच्या गाडीने प्रवास...
पालकमंत्री यशोमती ठाकूर
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 12:43 PM

मुंबई : राज्य परिवहन महामंडळ (ST) राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एसटी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच बस डेपोचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. बसस्थानक परिसरात शुकशुकाट बघायला मिळतोय. एस टी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न जटील बनत जात आहे.

एसटी आंदोलनाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना 

आता काही एसटी कर्मचारी कामावर रूजू देखील होत आहेत. मात्र, एखाद्या डेपोमधून 2 किंवा 3 सुटत आहेत. त्यामध्येही राज्यामध्ये आता शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेमध्ये जाण्यासाठी सर्रास एसटी बसचा वापर करतात. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो आहे. 8-10 किलो मीटर पायी प्रवास करून शाळा गाठावी लागते आहे.

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा चक्क पालकमंत्र्यांसोबत प्रवास  

असाच एक अनुभव अमरावती जिल्हामध्ये आला असून शाळेमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी बसची वाट पाहात रस्त्यावर उभे होते. त्याचवेळी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) अमरावती नागपूर मार्गावरून तीवसाकडे जात असताना त्यांना काही विद्यार्थी रस्त्यावर थांबलेले दिसले आणि हे विद्यार्थी बसची वाट पाहात असल्याचे यशोमती ठाकूर यांच्या लक्षात आले.

कुठलाही विचार न करता यशोमती ठाकूर यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस करत चक्क आपल्या गाडीमध्ये विद्यार्थ्यांना बसवून त्यांना फत्तेपुरला सोडले. या विद्यार्थ्यांच्या प्रवासासोबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करा… मोठे अधिकारी व्हा…म्हणतं विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. यावेळी विद्यार्थ्यांना यशोमती ठाकूर यांनी चॉकलेट देखील दिले.

संबंधित बातम्या : 

Sadabhau Khot : टायर डिझेल ते बांधकाम सगळ्याच गोष्टीत भ्रष्टाचारानं यांचे हात बरबटलेले, सदाभाऊ खोतांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Mumbai School Reopen: मुंबईत मराठी माध्यमांच्या शाळांची घंटा आजच वाजणार, कॉन्व्हेंट, इंग्रजी शाळांना नवा मुहूर्त

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.