फडणवीसांनी जाणून घेतल्या अमरावतीतील लोकांच्या भावना, रडत रडत सांगितली नागरिकांनी आपबिती

या दौऱ्यात अमरावतीच्या खासदार नवनित राणा या देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेस्ट हाऊसला आल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, महापौर चेतन गावंडे यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते.

फडणवीसांनी जाणून घेतल्या अमरावतीतील लोकांच्या भावना, रडत रडत सांगितली नागरिकांनी आपबिती
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते


अमरावती : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सुरुवातीला विश्रामगृहात भाजप नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी शहरात झालेली दगडफेक आणि त्यातून निर्माण झालेला तणाव कसा होता, याची आपबिती लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितली. यावेळी नागरिकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.

नवनित राणा फडणवीसांच्या भेटीला

या दौऱ्यात अमरावतीच्या खासदार नवनित राणा या देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेस्ट हाऊसला आल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, महापौर चेतन गावंडे यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस मसानगंज परिसरात नुकतेच गेले. या परिसरात दुकानांची तोडफोड झाली होती.

दगडफेकीच्या घटनेची दिली माहिती

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता अमरावती शहरातील वातावरण पूर्वपदावर येत आहे. हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेत घेतली. यावेळी जखमींनी ते कसे जखमी झाले याची माहिती फडणवीस यांना दिली. ही दगडफेक अतिशय अमाणूस होती. कुणाच्याही जीवाची यात पर्वा करण्यात आली नव्हती, असं जखमी नागरिकांनी फडणवीस यांना सांगितले. यावेळी नागरिकांचे डोळे ओले झाले होते.

यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अमरावतीचा दौरा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस आयुक्तांनी त्यांना अमरावतीच्या हद्दीत येण्यावर निर्बंध लावले होते. संचारबंदीनंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा आखण्यात आला आहे.

त्रिपुरातील प्रकरणानंतर अमरावती शहरात हिंसाचार घडून आला. यात अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज अमरावती परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस पोलीस आयुक्त आरती सिंग व व्यापाऱ्यांचीही भेट घेणार आहेत. १२ व १३ नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात हिंसाचार झाला होता.

परस्त्रीशी नवऱ्याची मैत्री खटकायची, व्हिडीओ कॉल करुन वारंवार संशय, अखेर 16 वेळा भोसकून पत्नीची हत्या

जगात भारी! 11 फुटबॉलची मैदाने बसतील एवढं मोठं, खर्च तब्बल 23 कोटी, पाहा जगातील सर्वात मोठं स्विमिंग पूलची झलक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI