Anil Bonde | मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे मोठ्या घरचा पोकळ वासा, हवा गेली भसाभसा; अमरावतीत अनिल बोंडेंनी उडवली खिल्ली

बोंडे म्हणाले, राज्यात बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. हे सर्व विषय मुख्यमंत्र्यांनी हाताळले नाहीत. औरंगाबादच्या नामांतरणाविषयी अवाक्षरही बोलले नाहीत. संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. शिवसेनेच्या अजेंड्यात औरंगाबादचे संभाजीनगर करणार, असे घोषणापत्रात लिहिले होते. यावर मुख्यमंत्री काहीच का बोलले नाही.

Anil Bonde | मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे मोठ्या घरचा पोकळ वासा, हवा गेली भसाभसा; अमरावतीत अनिल बोंडेंनी उडवली खिल्ली
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 2:14 PM

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काल मुंबईत सभा घेतली. मुख्यमंत्र्यांची कालची सभा म्हणजे मोठया घरचा पोकळ बासा आणि हवा गेली भसा भसा, अशी टीका भाजपच्या अनिल बोंडे (BJP’s Anil Bonde) यांनी केली. भोंडे म्हणाले, मुख्यमंत्री मुंबई म्हणजेच महाराष्ट्र आहे असे समजायला लागलेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नवर तरुणांच्या प्रश्नावर ते काहीच बोलले नाही. काकांच्या (शरद पवारांच्या) डोक्यात सगळी किळमट आहे. अजित पवारांना (Ajit Pawar) आजही वाटते यांच्यापेक्षा भाजप बरी आहे. संभाजी नगर तोंडाने म्हणून जमत नाही; सरकार दरबारी नोंद असली पाहिजे, असा टोलाही बोंडे यांनी लगावला.

औरंगाबादच्या नामांतरणाविषयी का बोलले नाही

बोंडे म्हणाले, राज्यात बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. हे सर्व विषय मुख्यमंत्र्यांनी हाताळले नाहीत. औरंगाबादच्या नामांतरणाविषयी अवाक्षरही बोलले नाहीत. संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. शिवसेनेच्या अजेंड्यात औरंगाबादचे संभाजीनगर करणार, असे घोषणापत्रात लिहिले होते. यावर मुख्यमंत्री काहीच का बोलले नाही, असंही ते म्हणाले.

केतकीसोबतच शरद पवारांवरही टीका

अनिल बोंडे यांनी केतकीसोबत शरद पवार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, निश्चितच केतकी चितळे ही चुकली आहे. वयोवृद्ध माणसाला असं बोलू नये. पण शरद पवारही तर चुकले. केतकी चितळेला शरद पवारांच राजकारण कळत नाही. शरद पवारांना हिंदू धर्मात उभी फूट पाडायची आहे. देवेंद्र फडणवीस हे ब्राम्हण असल्यामुळं त्यांच्या विरुद्ध सर्व समाजाला पेटवायचं. कुटिल कारस्थान शरद पवार करतात, असंही अनिल बोंडे म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.