‘देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही किती घाणेरडे आणि खालच्या थराचे…’, अनिल देशमुख यांचं भाजपला प्रत्युत्तर

भाजपच्या युवा मोर्चाकडून नागपूरमध्ये एक होर्डिंग लावण्यात आलं आहे. या पोस्टरवर देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांचा फोटो लावण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवर विकास दृष्टी असं म्हटलं आहे. तर अनिल देशमुख यांच्या फोटोवर बसूली बुद्धी असं म्हणण्यात आलं आहे. या पोस्टरच्या माध्यामातून अनिल देशमुख यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यानंतर अनिल देशमुख यांनी या होर्डिंगचा फोटो X वर ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

'देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही किती घाणेरडे आणि खालच्या थराचे...', अनिल देशमुख यांचं भाजपला प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 9:54 PM

महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलं आहे. बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने नुकतेच अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आपल्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच सचिन वाझे याने आपल्यावर आरोप केले असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला. अनिल देशमुख यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यानंतर अनिल देशमुख यांनी आज नागपूरमधील एका बॅनरचा फोटो ट्विट करत भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

नागपूरच्या रामनगर परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाकडून होर्डिंग लावण्यात आलं आहे. या होर्डिंगवर विकास वृत्ती असं लिहून त्याखाली देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे. तर वसुली बुद्धी असं लिहून त्याखाली अनिल देशमुख यांचा फोटो लावण्यात आला आहे. अनिल देशमुख यांचा फोटो ब्लॅक बॅकग्राऊंडवर असून त्यासमोर तुरुंगात दाखविण्यात आलेला आहे. होर्डिंगचा हा फोटो अनिल देशमुख यांनी ‘एक्स’वर टाकला असून जनता जनार्दनानं हे लक्षात ठेवावं असं उल्लेख केला आहे.

अनिल देशमुख काय म्हणाले आहेत?

“धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी! महाराष्ट्रात तुम्ही किती घाणेरडे आणि खालच्या थराचे राजकारण करत आहात, याचा नवीन अंक आज नागपूरच्या जनतेला पुन्हा एकदा तुमच्याकडून पाहायला मिळाला. लक्षात असू द्या… जनता जनार्दन आहे”, असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

प्रवीण दरेकर यांचा अनिल देशमुखांवर निशाणा

दुसरीकडे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे. “महाराष्ट्रात तुम्ही कितीही खोटारडे आणि खालच्या स्तराचे राजकारण केले तरी ते अजिबात चालणार नाही. तुमच्यातील सावत्र भावाचे रूप महाराष्ट्र रोज पाहतो आहे. लक्षात ठेवा, माय-माऊली तुम्हाला कधीच माफ करणार नाही”, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुख यांच्यावर केली.

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार.
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'.
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली.
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.