AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय स्पर्धा सुरु आहे का? कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन अंजली दमानिया संतापल्या

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानांना आणि विधानसभेत पत्ते खेळल्याच्या प्रकरणाला कारणीभूत ठरत, दमानिया यांनी त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. अजित पवार यांच्या प्रतिक्रियेवरही त्यांनी टीका केली आहे. दमानिया यांच्या मागणीमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

काय स्पर्धा सुरु आहे का? कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन अंजली दमानिया संतापल्या
anjali damania ajit pawar
| Updated on: Jul 30, 2025 | 1:36 PM
Share

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या घटनांवर भाष्य केले. यावेळी अंजली दमानिया यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावर अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच माणिकराव कोकाटे हे अधिवेशनात पत्ते खेळताना दिसल्याने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.

अंजली दमानिया यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्या भेटीबद्दलही भाष्य केले. अजित पवारांनी सुरुवातीला असे म्हटले होते की जर शिंदेंच्या मंत्र्यांवर कारवाई झाली तरच आम्ही आमच्या मंत्र्यांवर कारवाई करणार, याला स्पर्धा म्हणावी लागेल. ही धक्कादायक बाब आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

कारवाई झाली नाही तर दुर्दैवी

त्यांनी पुढे नमूद केले की, अजित पवारांनी कोकाटेंना किती वेळा माफ करणार? असे म्हटल्याचे ऐकलं आहे. माणिकराव कोकाटेंनी यापूर्वीही अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी माफी मागितली आहे, असे दमानिया यांनी निदर्शनास आणले. यात आपल्याला थेट कारवाई कुठेही झालेली दिसत नाही. एकदा ओसाड गावची पाटील की म्हणजे कृषिमंत्री पद हे म्हणणं तिथेच खरं तर ऑब्जेक्शन घेणं गरजेचं होतं. पण एकदा नाही अनेक वेळा विमा वर्ण म्हणा, शेतकऱ्यांना मारलेले टोले म्हणा किंवा ओसाड गावची पाटील की म्हणा इतकी विधान करून सुद्धा कारवाई झाली नाही. आता तर थेट पत्ते खेळताना जेव्हा दिसतात, तरी जर कारवाई झाली नाही तर दुर्दैवी आहे. खरं अजित पवारांनी हे करणं अपेक्षित होतं, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.

ताबडतोब राजीनामा झाला पाहिजे

यानंतर अंजली दमानिया यांनी रोहित पवारांच्या ट्वीटबद्दलही भाष्य केले. “अधिवेशनात काय करत होते, कोणी आरोप काय केले? मला त्याच्यात नाही पडायचे. आपल्याला दिसतंय की त्या अधिवेशनात पत्ते खेळत होते. एका मंत्र्याकडूनही अपेक्षा नक्कीच नसते. लोकांचे प्रश्न मांडायला तुम्ही तिथे अधिवेशनात जातात. हे जर तुम्ही कृत्य केलं, तर ताबडतोब राजीनामा झाला पाहिजे,” असे दमानिया यांनी ठामपणे सांगितले. अंजली दमानिया यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा मुद्द्यांवर चर्चा पाहायला मिळत आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा