‘तुमच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सगळी कागदपत्रं खिशात, सगळे डिटेल्स देतो’; सामनाच्या अग्रलेखावरुन अण्णा हजारे आक्रमक
आजचा अग्रलेख लिहिण्याचं कारण काय सांगा?, मग मी सगळं काही बाहेर काढतो, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी शिवसेनेला दिला. (Anna Hazare shivsena curruption)

अहमदनगर : “आमच्या समोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. आमच्यापुढे फक्त समाज आणि देश आहे. ज्या वेळी समाज आणि देशासाठी घातक असणारे कृत्य होत असते. त्यावेळी आम्ही आंदोलन करतो. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल,” असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी शिवसेनेला दिला. ते राळेगणसिद्धीत बोलत होते. तसेच आजचा अग्रलेख लिहिण्याचं कारण काय सांगा?, मग मी सगळं काही बाहेर काढतो, असंही अण्णा हजारे म्हणाले. (Anna Hazare said that he will bring the shiv sena’s all curruption cases in ligh)
हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपोषण करण्याचे जाहीर करुन ते मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून अण्णा यांची भूमिका नेमकी काय आहे?, असा खोचक सवाल केला. त्यांनंतर अण्णा हजारे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
भाजपच्या काळातील आंदोलनं विसरलात का?
यावेळी बोलताना अण्णा हजारे यांनी शिवसेनेवर चौफेर टीका केली. शिवसेनेचा मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत तो बाहेर काढण्याचाही निर्वाणीचा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला. “तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल,” असं अण्णा म्हणाले. तसेच, भाजप सत्तेवर आल्यानंतर माझे एकूण 6 आंदोलनं झाली, हे आंदोलन आपण विसरलात का?,” असा प्रतिप्रश्नही त्यांनी शिवसेनेला केला.
सामना अग्रलेखात काय लिहलंय?
अण्णा हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आवाहन शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात (30 जानेवारी) केले. “लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. राळेगणात बसून भाजपच्या नेत्यांसोबत प्रस्ताव आणि चर्चेच्या फेऱ्या करून काय उपयोग? अण्णांनी आधी उपोषण जाहीर केले आणि आता केंद्र सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून ते स्थगित केले. हे सगळे ठीक आहे, पण शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणाऱ्या कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे? या कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर मरमिटण्यास तयार असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का? अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या!,” शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामध्ये म्हटलंय.
संबंधित बातम्या :
देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई यशस्वी; अण्णा हजारेंची उपोषणाआधीच माघार
Anna Hazare | उच्चाधिकार समिती स्थापन करण्याच्या अश्वासनानंतर उपोषणाला स्थगिती: अण्णा हजारे
अण्णांचा संयम सुटला, मोदींना पत्र; उपोषणाचा इशारा
(Anna Hazare said that he will bring the shiv sena’s all curruption cases in ligh)