अरण्यऋषी मारुती चितम्पल्ली यांना ‘पद्मश्री’, कुणाकुणाला पद्म पुरस्कार जाहीर?; पाहा संपूर्ण यादी
मोठी बातमी समोर येत आहे, 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अरण्यऋषी मारुती चितम्पल्ली यांना 'पद्मश्री'ने गौरवण्यात आलं आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे, देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारामध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या तीन पुरस्कारांचा समावेश होतो. आज या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्यामध्ये साहित्यिक मारुती चितमपल्ली, वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये मोठं योगदान असणारे चैत्राम पवार तसेच प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे.
1954 पासून दर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात येतात. या पुरस्कारासाठी ज्यांच्या नावाची घोषणा झाली, त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन करून या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावेळी साहित्यिक मारुती चितमपल्ली, वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये मोठं योगदान असणारे चैत्राम पवार तसेच प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्म पुरस्काराची यादी
हरिमन शर्मा, जुम्दे योमगम गॅमलिन, जॉयनाचरण बथारी, नरेन गुरुंग, विलास डांगरे, सैखा एझ अल सबा, निर्मला देवी, भीम सिंग भावेश, राधा बहन भट्ट, सुरेश सोनी, पंडी राम मानवी, जोनास मासेट्टी, जगदीश जोशिला, हरविंदर सिंग, भेरू सिंह चौहान, वेंकप्पा अंबाजी सुगतकर, पी दच्चनामूर्ती, निरजा भाटला, मारुती भुजंगराव चितमपल्ली, भीमव्वा दोड्डाबलप्पा सिल्कायतारा, सॅली होळकर, गोकुळ चंद्र दास, चैत्राम पवार यांना हा पुसस्कार जाहीर झाला आहे.
कोण आहेत मारुती चितम्पल्ली?
मारुती चितम्पल्ली यांना अरण्यऋषी म्हणून देखील ओळखलं जातं. त्यांचा जन्म सोलापुरात 5 नोव्हेंबर 1932 साली झाला. वनाधिकारी म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा केली. मारुती चितम्पल्ली यांनी वने, वण्यप्राणी जीवन आणि वण्यप्राणी व्यवस्थापन यासंदर्भात मोठ्या प्रमाणात संशोधन केले. वण्यप्राण्यांबाबत माहिती सांगणारी विपूल ग्रथसंपदा त्यांनी तयार केली. आज पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, त्यांच्यासोबतच चैत्राम पवार तसेच प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
