AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या तीन नेत्यांना खरातप्रकरणात सहआरोपी करा, तिसरा राज्यातील अत्यंत मोठा नेता; लिंगपिसाट खरातवरून दोन्ही राष्ट्रवादीत जुंपली

सध्या संपूर्ण राज्यात अशोक खरात हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. खरातचे राजकीय व्यक्तींसोबत असलेले संबंध पाहात मोठी खळबळ माजली आहे. आता खरातच्या जवळच्या नेत्यांना सह आरोपी करण्याची मागणी होत असताना दोन्ही राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे.

या तीन नेत्यांना खरातप्रकरणात सहआरोपी करा, तिसरा राज्यातील अत्यंत मोठा नेता; लिंगपिसाट खरातवरून दोन्ही राष्ट्रवादीत जुंपली
अशोक खरातImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 28, 2026 | 1:51 PM
Share

लिंगपिसाट भोंदू बाबा अशोककुमार खरातवरून आता दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आल्या आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यासह अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. त्यावर अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. भोंदूबाबा खरातला पाणी दिलं त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते. जयंत पाटील यांचे भोंदू खरातसोबत असंख्य फोटो असल्याने आधी जयंत पाटलांनाच याप्रकरणात सहआरोपी करा, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली आहे.

आनंद परांजपे काय म्हणाले?

विकास लवांडे गांडूळासारखी आपली वळवळ बंद करा. माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अत्यंत विस्तृतपणे भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर कडक कारवाई महायुतीचे सरकार करतोय गृहमंत्री म्हणून ते स्वतः लक्ष देऊन करताय त्याची संपूर्ण माहिती दिली. कॅप्टन अशोक खरात याला मदत करणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीची चौकशी होईल व त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ही महायुतीच्या सरकारची आहे. चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा काल दिलेला आहे. निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे असे आनंद परांजपे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या बघायचं वाकून ही प्रवृत्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची राहिलेली आहे. पहिल्या दिवसापासून सातत्याने आरोप विकास लवांडे करण्यात आलेले असते, तर आज त्यांनी प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना सह आरोपी करा अशा प्रकारचा आरोप केला. मला तर ही शंका येते की त्यांचे युवा नेते आमदार रोहित पवारांच्या सांगण्यावरून त्यांनी हा आरोप केला नाही ना ? कारण जलसंपदा मंत्री असताना कोणाच्या आदेशाने ट्रस्टला पाणी दिले गेले कोण जलसंपदा मंत्री होत कोण मुख्यमंत्री होते. जलसंपदा मंत्री विकास लवांडेची त्यावेळेला जयंत पाटील होते आणि जयंत पाटील प्रांताध्यक्ष असताना अनेक त्यांचे फोटो आणि भेटी त्यावेळेला भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात कडे झालेले आहेत तर त्यांना देखील सह आरोपी करण्यात यावं.

काय म्हणाले होते विकास लवांडे?

“राज्यभरात सध्या अशोक खरात यांचे प्रकरण गाजत आहे आणि हा लिंगपिसाट अशोक खरात यांने अनेक महिलांचं शोषण केल आहे त्यामुळे याला तर शिक्षा झालीच पाहिजे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे आणि काल महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे पण राजीनामा देऊन काही होणार नाही. यांना या प्रकरणात सहआरोपी करण गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सुनील तटकरे यांना देखील सहआरोपी करण गरजेचं आहे. कारण रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे हे या अशोक खरातच्या नेहमी संपर्कात होते आणि त्यांना भेटायला जायचे

सिन्नर तालुक्यातील हा अशोक खरात बाबा होता. पण त्याला स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे हे विरोध करायचे आणि या बाबासोबत त्यांचे एक फोटो आणि व्हिडीओ समोर आला नाही आहे. पण याच माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून या अशोक खरात यांने सुनील तटकरे यांना आग्रह धरला होता की नाही? याचा खुलासा सुनील तटकरे यांनी केला पाहिजे आणि माणिकराव कोकाटे यांनी बोलला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे या दोघांना सह आरोपी केला पाहिजे.”

Follow Us
वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत..
MVA : वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत थेट मैदानात एंट्री
10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील....
Sangli : 10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ, व्हिडिओ बघाच
ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई
Gyanesh Kumar Hearing Update : ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई नाकारली, कारण...
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
Chitra Wagh vs Rohit Pawar : लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप