AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदूबाबा खरातच्या बायकोसोबत एसआरएच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा आर्थिक व्यवहार; मोठी माहिती उघड होताच राज्यात खळबळ

कॅप्टन अशोक खरातबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. खरातच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमीन व्यवहारात एसआरए मधील अधिकाऱ्याच्या पत्नीचा थेट सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

भोंदूबाबा खरातच्या बायकोसोबत एसआरएच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा आर्थिक व्यवहार; मोठी माहिती उघड होताच राज्यात खळबळ
Ashok kharatImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 22, 2026 | 11:45 AM
Share

अक्षय मंकनी, प्रतिनिधी: नाशिकच्या ‘भोंदू बाबा’ कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक पैलू समोर आला आहे. खरातच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमीन व्यवहारात एसआरए (Slum Rehabilitation Authority) मधील अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीचा थेट सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या आर्थिक व्यवहारामुळे राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अभिजीत भांडे पाटील हे मूळचे महसूल विभागाचे अधिकारी असून, सध्या प्रतिनियुक्तीवर एसआरएमध्ये कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरदहस्तामुळे त्यांना एसआरएमध्ये हे पद मिळाले असल्याची चर्चा आहे. एसआरएच्या नियमांनुसार, उपजिल्हाधिकारी पदाचा अधिकारी प्रतिनियुक्तीवर फक्त ३ वर्षे काम करू शकतो. मात्र, अभिजीत भांडे पाटील गेल्या ४ वर्षांपासून या पदावर कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणातील मुख्य मुद्दा म्हणजे नाशिक तालुक्यातील पाथर्डी शिवारातील सुमारे १ एकर (४० आर) जमिनीचा सातबारा. या जमिनीवर अशोक कुमार खरात आणि अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नी प्रीती भांडे पाटील यांची नावे सामायिक (संयुक्त) मालकीदार म्हणून नोंदवलेली आहेत. हे व्यवहार केवळ आध्यात्मिक किंवा वैयक्तिक संबंधांपुरते मर्यादित न राहता थेट आर्थिक भागीदारीपर्यंत पोहोचले असल्याचे दिसते. खरातच्या अफाट संपत्तीच्या (२०० कोटींपेक्षा अधिक) चौकशीत हे कनेक्शन उघड झाले आहे.

एसआरए ही संस्था झोपडपट्टी पुनर्वसनासाठी काम करते आणि तिच्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचे व्यावसायिक व्यवहार होणे गंभीर बाब आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे व्यवहार खरातच्या ‘ज्योतिष’ आणि ‘समस्या निवारण’च्या नावाखाली मिळालेल्या पैशांमधून झाले असण्याची शक्यता आहे. याशिवाय शिर्डी, सिन्नर आणि इतर परिसरात खरातच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींच्या मालमत्ता असल्याचेही समोर आले आहे.

या गोष्टीमुळे एसआयटी (विशेष तपास पथक) आणि आयकर विभागाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. अभिजीत भांडे पाटील यांच्या भूमिकेची, नियमांचे उल्लंघन झाले का आणि हे व्यवहार वैध आहेत का याची चौकशी होण्याची शक्यता आहे. खरात प्रकरण आता फक्त लैंगिक शोषणापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांशी आर्थिक संबंध, नियमबाह्य प्रतिनियुक्ती आणि संभाव्य प्रभाव क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे. राज्यातील हे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत असून, यातून आणखी मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. SIT आणि संबंधित यंत्रणा याबाबत सखोल तपास करत असल्याचे समजते.

Follow Us
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड