AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat : अशोक खरातचा थेट एन्काऊंटर? एका दाव्याने महाराष्ट्रात खळबळ; ठीक 24 तारखेला…

भोंदुबाबा अशोक खरात याला लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तो 24 मार्चपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे. असे असतानाच त्यांच्या एन्काऊंटरबाबात मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat : अशोक खरातचा थेट एन्काऊंटर? एका दाव्याने महाराष्ट्रात खळबळ; ठीक 24 तारखेला...
ashok kharatImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 21, 2026 | 9:10 PM
Share

Ashok Kharat : भोंदू बाबा अशोक खरातने भोंदुगिरीच्या मदतीनेत अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. एका महिलेने समोर येत बलात्कार केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर अशोक खरातचे हे बिंग फुटले आहे. त्याने वेगवेगळ्या महिलांवर अत्याचार केलेले जवळपास 100 व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधवलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आता अशोक खरातला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता त्याचे एन्काऊंटर होणार असल्याचा दावा समोर आला आहे. या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

अशोक खरात प्रकरणात तीनच दिवसांत…

भूमता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी अशोक खरात याचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशी शंका व्यक्त केली आहे. “अशोक खरात प्रकरणात तीनच दिवसांत रुपली चाकणकर यांचे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गेले. माझी सुनेत्रा पवार यांनी रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.

न्यायालयापुढे हजर करताना त्याचे एन्काऊंटर…

अशोक खरात याचे संबंध अनेक मंत्री, राजकारण्यांशी आहेत. त्यामुळे अनेकांचे पितळ उघडे पडू शकते. त्याचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध आहेत. हे संबंध पुढे येऊ शकतात. म्हणूनच अशोक खरात याला संपवण्याचा कट रचला जाऊ शकतो, असा दावा तृप्ती देसाई यांनी केला. तसेच मला नाशिकहून काही पीडित महिलांचा फोन आला होता. 24 मार्चपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी मिळालेली आहे. 24 तारखेला त्याला न्यायालयापुढे हजर करताना त्याचे एन्काऊंटर होऊ शकते. हे प्रकरण पूर्णपणे बंद केले जाऊ शकते, अशीही पुष्टी त्यांनी जोडली.

एन्काऊंटर करण्याचा डाव असेल तर…

अशोक खरातने मोठा कांड केलेला आहे. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केलेले आहे. त्याला तातडीने संपवून चालणार नाही. त्याला प्रत्येक दिवशी शिक्षा मिळाली पाहिजे. त्याचे एन्काऊंटर करण्याचा डाव असेल तर तो उधळून लावला पाहिजे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी केली.

Follow Us
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर....
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर.....
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी...
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी....
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं.
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक.....
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक......
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.