संजय राठोडांच्या ‘त्या’ ऑडिओ क्लीप्स बनावट; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा दावा

या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेचे वरिष्ठ नेते सावध भूमिका घेत असताना राजेंद्र गायकवाड यांनी मात्र आक्रमकपणे पुढे येत संजय राठोड (Sanjay Rathod) यांची पाठराखण केली आहे. | Audio clips pooja chavan suicide case

संजय राठोडांच्या 'त्या' ऑडिओ क्लीप्स बनावट; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा दावा
संजय राठोड, वनमंत्री
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 4:45 PM

यवतमाळ: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लीप्स या खोट्या आहेत, असा दावा शिवसेनेचे नेते राजेंद्र गायकवाड (Rajendra Gaikwad) यांनी केला आहे. राजेंद्र गायकवाड हे शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख आहेत. या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेचे वरिष्ठ नेते सावध भूमिका घेत असताना राजेंद्र गायकवाड यांनी मात्र आक्रमकपणे पुढे येत संजय राठोड (Sanjay Rathod) यांची पाठराखण केली आहे. (Pooja Chavan suicide case in Maharashtra)

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शुक्रवारी एक व्हीडिओ ट्विट करत संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीही करावी, असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते. मात्र, राजेंद्र गायकवाड यांनी त्यांना फटकारले आहे. चित्रा वाघ कोण आहेत?, असा सवाल राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थित केला.

संजय राठोड यांनी विदर्भात शिवसेना पक्ष विस्तारण्याचे काम केले आहे. याच गोष्टीचा भाजपने धसका घेतला आहे. त्यामुळे भाजपने संजय राठोड यांच्याविरोधात हे षडयंत्र रचले, असा आरोप राजेंद्र गायकवाड यांनी केला.

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

तसेच सोशल मीडियावर संजय राठोड यांच्या संभाषणाच्या व्हायरल होणाऱ्या क्लीप्स बनावट असल्याचा दावाही गायकवाड यांनी केला. पोलिसांनी या ऑडिओ क्लीप्सची सत्यता पडताळली पाहिजे. याप्रकरणाची चौकशी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे, असेही राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

शिवसेनेची नेत्यांना तंबी

संजय राठोड यांच्या प्रकरणामुळे शिवसेनेची प्रचंड कोंडी झाली आहे. या प्रकरणी शिवसेना नेत्यांना प्रतिक्रिया विचारल्या जात आहेत. त्यातच राठोड यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यांची बाजू मांडलेली नाही. त्यामुळे काय प्रतिक्रिया द्यावी हा शिवसेना नेत्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मीडियासमोर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अशी तंबीच शिवसेनेकडून नेत्यांना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राठोडांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आणि आज या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला? तपासात काय तथ्य आहे? राठोड यांचा कितपत सहभाग आहे? व्हायरल क्लिपमध्ये कितीपत सत्यता आहे? त्यातील आवाज राठोडांचाच आहे का? आधी बाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली असावी असं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी मुख्यमंत्री गंभीर असून ते राठोडांवर कारवाई करू शकतात, असंही सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजचा दिवस राठोड यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं मानलं जात आहे.

संबंधित बातम्या:

संजय राठोडांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्येच उभी, मीडियाशी बोलू नका; शिवसेना नेत्यांना तंबी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत बोलले, पण…

फोटो स्टोरी: एक होती पूजा! टिकटॉक स्टार ते सामाजिक कार्यकर्ती!

(Pooja Chavan suicide case in Maharashtra)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.