‘लोकपत्र’चे संपादक रवींद्र तहकीक हल्ला प्रकरण, पाच जणांवर गुन्हा, मुख्य आरोपी पोलिसात शरण

भाजप खासदार नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी तहकीक यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे (Aurangabad Lokpatra Ravindra Tahkik attack)

'लोकपत्र'चे संपादक रवींद्र तहकीक हल्ला प्रकरण, पाच जणांवर गुन्हा, मुख्य आरोपी पोलिसात शरण
'लोकपत्र' वृत्तपत्राचे (Lokapatra) संपादक रवींद्र तहकीक
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 2:59 PM

औरंगाबाद : ‘लोकपत्र’ वृत्तपत्राचे (Lokapatra) संपादक रवींद्र तहकीक (Ravindra Tahkik) यांच्या तोंडाला काळं फासल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी मुख्य आरोपी गणेश उगले याने सकाळीच औरंगाबादमधील एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात सरेंडर केलं होतं. भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कार्यकर्त्यांनी तहकीक यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. (Aurangabad Lokpatra Newspaper Editor Ravindra Tahkik attack Five Narayan Rane supporters booked)

मुख्य आरोपी पोलिसात शरण

भाजप खासदार नारायण राणे यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या रागातून राणे समर्थकांनी ‘लोकपत्र’ वृत्तपत्राचे संपादक रवींद्र तहकीक यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्या चेहऱ्याला काळं फासल्याचा आरोप आहे. औरंगाबादमध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली होती. रवींद्र तहकीक यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केले होते. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्य आरोपी गणेश उगले सोमवारी सकाळीच एमआयडीसी सिडको पोलिसात स्वतःहून हजर झाला.

नारायण राणे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील वादावर लेख

‘लोकपत्र’ वृत्तपत्राचे संपादक रवींद्र तहकीक यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्याविषयी वर्तमानपत्रात लेख लिहिला होता. नारायण राणे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील वादावर हा लेख लिहिला होता. राणेंचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांचा फोटो लेखाला लावण्यात आला आहे. राणे यांच्याबाबत लेखात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. लेख प्रसिद्ध झाल्यानंतर राणे यांच्या संतप्त समर्थकांनी हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला होता.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | ‘लोकपत्र’च्या संपादकांवर कार्यालयात हल्ला, आक्षेपार्ह लिखाणावरुन राणेंच्या कार्यकर्त्यांचा संताप

संभाजीराजे राजीनामा देऊ नका, भाजपात राहूनच आरक्षण मिळेल, नारायण राणेंचा शहाजोग सल्ला

‘कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केले?’, नारायण राणेंचा सवाल

(Aurangabad Lokpatra Newspaper Editor Ravindra Tahkik attack Five Narayan Rane supporters booked)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.