Aurangabad | आता बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स असोसिशनचा संप, शहरातील बांधकामे बंद पडण्याची शक्यता

Aurangabad | आता बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स असोसिशनचा संप, शहरातील बांधकामे बंद पडण्याची शक्यता
बांधकाम कॉन्ट्रॅक्टर्सचा संप, एक ते चार एप्रिलपर्यंत बांधकामे बंद ठेवणार
Image Credit source: TV9 Marathi

बांधकाम क्षेत्र हे असंघटित क्षेत्र असल्यामुळे आमच्या मागण्या मांडण्यासाठी कुठलाही मंच उपलब्ध नाही. त्यामुळे जनता, बिल्डर्स, डेव्हलपर्सचे तसेच खासगी बांधकाम करणारे घरमालक यांचे लक्ष वेधण्यासाठी, अगदी नाईलाजाने आम्हाला औरंगाबादमधील सर्व प्रकारची बांधकाम चार एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

संजय सरोदे

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Mar 29, 2022 | 3:12 PM

औरंगाबाद | महावितरण, महानिर्मिती, महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरोधात देशव्यापी संप (Strike) पुकारला आहे. एसटी महामंडळाच्या (ST Employee) कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. त्यातच आता औरंगाबादमधील बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स (Contractors) असोसिएशनने चार दिवसांचे लाक्षणिक कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे औरंगाबादमधील बांधकामे बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मंच उपलब्ध नसल्याने आणि बिल्डर, डेव्हलपर्स, तसेच खाजगी बांधकाम करणाऱ्यांचे यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे बिल्डिंग काँट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले. परंतु या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व बिल्डिंग काँट्रॅक्टर्स आपल्या मागण्यांसाठी किती एकत्र येतात हे बघावे लागेल.

काय आहेत मागण्या?

जिल्ह्यातील सर्व बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्सना व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडवणे आणि इमारत बांधकामाच्या दरात एकसूत्रता आणणे हा औरंगाबाद बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेमागील उद्देश आहे. अकुशल कामगारांच्या मजुरीत मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी 40 टक्क्यांची वाढ झालेली आहे. तसेच वाढलेल्या बांधकाम साहित्याच्या किंमतीमुळे बांधकाम ठेकेदार अतिशय अडचणीत सापडला आहे. यामुळे व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे आणि यावर बांधकामाच्या दरात वाढ होणे, हा एकमेव उपाय असल्याचे संघटनेचे मत आहे. बांधकाम क्षेत्र हे असंघटित क्षेत्र असल्यामुळे आमच्या मागण्या मांडण्यासाठी कुठलाही मंच उपलब्ध नाही. त्यामुळे जनता, बिल्डर्स, डेव्हलपर्सचे तसेच खासगी बांधकाम करणारे घरमालक यांचे लक्ष वेधण्यासाठी, अगदी नाईलाजाने आम्हाला औरंगाबादमधील सर्व प्रकारची बांधकाम चार एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

आंदोलन यशस्वी होणार का?

बांधकाम क्षेत्र हे असंघटित असल्यामुळे सर्वांना एकत्रित येण्यासाठी तसेच जनतेचे लक्ष वेधण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर्सच्या वतीने हेे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र अशा प्रकारचे हे पहिलेच आंदोलन असल्यामुळे त्याला कितपत प्रतिसाद मिळतोय, हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या-

Sangli Crime : सांगलीत रस्ताच्या कडेला बेवारस स्त्री जातीचे बाळ सापडले

Skin care tips : एका रात्रीत पिंपल्सची समस्या दूर करा! औषधांऐवजी घरगुती उपाय फायदेशीर!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें