AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

School Opens: औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात 5 वी ते 12 वीचे वर्ग उद्यापासून, शहराचा निर्णय काय?

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी एकूण 1224 एवढे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. तर शहरातील बाधितांचा आकडा 779 एवढ्यावर पोहोचला. सध्या शहरातील 100 रुग्णांची तपासणी केली असता त्यातील 49 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहे.

School Opens: औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात 5 वी ते 12 वीचे वर्ग उद्यापासून, शहराचा निर्णय काय?
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 12:38 PM
Share

औरंगाबादः राज्यभरात कोरोना संसर्ग वाढलेला असूनही त्याची तीव्रता मात्र कमी असल्याने अनेक जिल्ह्यांतील शाळा 24 जानेवारी अर्थात सोमवारपासून सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र मराठवाड्यात सर्वाधिक रुग्णसंख्येचा आकडा गाठणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा (Aurangabad district Schools) सुरु करायच्या की नाही, या संभ्रमात प्रशासन होते. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची आज यासंबंधी बैठक झाली. या बैठकीत जिल्हातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरु राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उद्यापासून म्हणजेच 25 जानेवारीपासून ग्रामीण भागातील या वर्गांमध्ये ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरु होईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

शहराची स्थिती काय?

औरंगाबाद शहरातील शाळांचा निर्णय पुढील आठवड्यात घेणार असल्याचं महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितलं होतं. सध्या शहरातील सध्या दहावी आणि बारावीचे वर्ग भरणार आहेत. कारण औरंगाबाद शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 49 टक्के आहे. कोरोना संसर्गाचे हे प्रमाण पाहता, स्थानिक प्रशासनाने शहरातील पहिली ते दहावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.

औरंगबादेत रविवारी किती रुग्ण?

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी एकूण 1224 एवढे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. तर शहरातील बाधितांचा आकडा 779 एवढ्यावर पोहोचला. सध्या शहरातील 100 रुग्णांची तपासणी केली असता त्यातील 49 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहे. मात्र रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे आढळून येत नसल्याने 95 टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्येच ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

मराठवाड्यात औरंगाबाद, लातूर, नांदेडात सर्वाधिक रुग्ण

मराठवाड्यातील कोरोना रुग्णसंख्येने मागील आठवड्यापासून चार हजारांचा आकडा पार केला आहे. यात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबादमध्ये रविवारी 1224 रुग्ण आढळून आले तर लातूरात 771 आणि नांदेडमध्ये 786   एवढे कोरोनाबाधित आढळून आले.

इतर बातम्या-

Good News| उद्योगनगरी औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा, जगात पहिल्या 5 शहरांत बाजी, कोणत्या क्षेत्रात विक्रमी घोडदौड?

औरंगाबादकरांनो, आरोग्य सांभाळा, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पन्नाशीच्या दिशेने, वाचा शहरासह मराठवाड्याचे Updates!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.