AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबादचे नवे आयुक्त अभिजित चौधरी उद्या रुजू होणार, कामावर येताच रॅम्कीच्या 37 कोटी भूर्दंडाचे आव्हान

महापालिकेचे सध्याचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या जागी अभिजित चौधरी यांची बदली करण्यात आली आहे.

Aurangabad | औरंगाबादचे नवे आयुक्त अभिजित चौधरी उद्या रुजू होणार, कामावर येताच रॅम्कीच्या 37 कोटी भूर्दंडाचे आव्हान
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 11:22 AM
Share

औरंगाबादः औरंगाबाद महापालिकेच्या  (Aurangabad municipal Corporation) आयुक्तपदी अभिजित चौधरी (Abhijit Chaudhari) यांची बदली करण्यात आली आहे. उद्या ते आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतील. अभिजित चौधरी हे सांगली येथील जिल्हाधिकारी (sangli Collector) पदावर कार्यरत होते. अभिजित चौधरी यांचं एमबीबीएस झालं असून डॉक्टर बनल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ते आयपीएस झाले. त्यानंतर त्यांनी भारतीय पोलीस सेवेचं प्रशिक्षण पूरण केलं. नंतर दुसऱ्या प्रयत्नात त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. अभिजित चौधरी हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी आहेत. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण भुसावळ येथे तर अकरावी-बारावीचे शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर त्यांनी केईएम महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी घेतली.

नव्या आयुक्तांसमोर आव्हानं कोणती?

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तोंडावरच औरंगाबादेत आयुक्तांची बदली झाली आहे. शहरातील महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरु झाली असून अंतिम प्रभाग रचनाही जाहीर झाली आहे. आता मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आगामी चार ते पाच महिन्यात महापालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. त्यामुळे ती पार पाडण्याचे मोठे आव्हान प्रशासक तथा आयुक्त म्हणून अभिजित चौधरी यांच्यासमोर आहेत. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला धारेवर धरत विविध राजकीय पक्षांनी शहरातील कचरा, पाणी आणि रस्त्यांसंबंधीचे प्रश्न उचलून धरले आहेत. यावर त्वरीत उपाययोजना करण्याचे आव्हानही चौधरी यांच्यासमोर आहे.

रॅम्कीला 37 कोटी द्यावे लागणार?

महापालिकेने 2009 मध्ये कचरा संकलनाचे काम हैदराबाद येथील रॅम्की कंपनीला दिले होते. मात्र दोनच वर्षात कंपनीने हे काम सोडले. त्यानंतर कंपनीने मनपाला करार रद्दची नोटीस पाठवून लवादाकडे दावा दाखल केला. लवादाने यावर निकाल देताना मनपाने 27 कोटी रुपये कंपनीला देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र या कोर्टानेही लवादाचा निर्णय मान्य केला. आजपर्यंत मनपाने ही रक्कम कंपनीला दिलेली नाही. त्यामुळे आता व्याजासह तब्बल 37 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ही रक्कम उभी करण्याचं मोठं आव्हान मनपा प्रशासनासमोर आहे.

आस्तिक कुमार पांडेय यांना नियुक्तीची प्रतीक्षा

महापालिकेचे सध्याचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या जागी अभिजित चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. मात्र पांडेय यांना मात्र अद्याप नवीन ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली नाही. यापूर्वी बदलीचे आदेश निघाले तेव्हा पांडेय यांना सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी बदलीचे आदेश देण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे सरकारचे त्या आदेशांना स्थगिती दिली होती. आता आस्तिक कुमार पांडेय यांना पुढील आदेशाची प्रतीक्षा आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.