Mega Textile Park News | लवकरच वस्त्रनगरीची पायाभरणी, तब्बल एक लाख नोकऱ्यांचे गिफ्ट! औरंगाबादेत काय आहे मेगा प्लॅन?

One Lakh Jobs News | मराठवाड्यात तरुणांच्या हातांना काम मिळणार आहे. थेट एक लाख नोकऱ्या देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तर दोन लाख जणांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे. काय आहे सरकारची योजना, जाणून घ्या

Mega Textile Park News | लवकरच वस्त्रनगरीची पायाभरणी, तब्बल एक लाख नोकऱ्यांचे गिफ्ट! औरंगाबादेत काय आहे मेगा प्लॅन?
वस्त्रनगरीतून रोजगाराच्या संधी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 10:49 AM

Mega Textile Park News | मराठवाड्यासह महाराष्ट्रातील तरुणांसाठी लवकरच नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने औरंगाबाद (Aurangabad) येथील औद्योगिकनगरीत (Auric City) तब्बल 1,000 एकरावर वस्त्रनगरी उभारण्याचा इरादा केला आहे. एक हजार एकरावर भव्य टेक्सटाइल पार्क (Mega Textile Park )उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या वतीने नुकताच केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला. प्रस्तावित पार्कमुळे एक लाख थेट रोजगार (Jobs)उपलब्ध होतील आणि दोन लाख लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळेल.पंतप्रधान मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अॅपॅरल (PM Mitta) योजनेंतर्गत औरंगाबाद औद्योगिकनगरीत (Auric city) देशभरात केंद्र सरकार सात भव्य वस्त्रनगरी उभारणार आहेत. ग्रीनफिल्ड (Green field) आणि ब्राऊन फील्ड (Brown Field) साइटमध्ये पीएम मित्रा योजनेंतर्गत देशभरात सात जागतिक दर्जाचे, सर्व सोयीसुविधांयुक्त मेगा टेक्सटाईल पार्क स्थापित केले जातील

तब्बल 4,445 कोटींची गुंतवणूक

कापड व्यवसायासाठी वस्त्रोद्योगांतर्गत वीज, पाणी, इंटरनेट, ओथर्ससह सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मेगा टेक्सटाइल पार्कसाठी लागणारी एक हजार एकरपेक्षा जास्त जमीन औरंगाबाद येथील औद्योगिक नगरीत(Auric City) जागतिक दर्जाच्या सुविधांच्या धरतीवर उपलब्ध आहे. या जमिनीवर केंद्र शासनाकडून मंजुरी मिळताच टेक्सटाईल पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने देशभरातील सात टेक्सटाईल पार्कसाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. 2027-28 पर्यंतच्या सात वर्षांच्या कालावधीत 4,445 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

अमरावतीसह औरंगाबादला वस्त्रनगरी

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे 13 राज्यांमधून टेक्साटाईल पार्क उभारणीसाठी 18 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील दोन प्रकल्पांचा समावेश आहे. विदर्भातील अमरावती येथेही टेक्साटाईल पार्क उभारणीचा प्रस्ताव असून औरंगाबाद येथील ऑरिक सिटीत मेगा टेक्साटाईल पार्क उभारण्यात येणार आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये

वस्त्रोद्योगाला आकार आणि स्केल प्राप्त करण्यास सक्षम करणे हे या उद्यानाचे उद्दीष्ट आहे, एकाच ठिकाणी आधुनिक आणि एकात्मिक – वस्त्रोद्योग मूल्य साखळी तयार करणे. ऑरिकमध्ये अजूनही अँकर प्रोजेक्टचा अभाव असल्याने, टेक्स टाइल पार्कला मान्यता मिळावी यासाठी राज्य सरकारकडून एकत्रित प्रयत्न करण्यात येत आहेत.

पीएम मित्रा मित्रा पार्कची प्रमुख वैशिष्ट्ये प्लग आणि प्ले सुविधांसह जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करतील आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात बड्या कंपन्यांचा समावेश करतील. सोबतच नवीन उद्योजकांनाही या पार्कमध्ये संधी देण्यात येणार आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होण्यास आणि रोजगाराला चालना मिळण्यास मदत होईल.

एका छताखाली सर्व सुविधा पुरवण्यात येणार आहे. एकात्मिक वस्त्रोद्योग हे एकाच ठिकाणी कातणे, विणकाम, प्रक्रिया, मरणे आणि कपड्यांच्या उत्पादनाची छपाई करण्यापासून ते विक्रीपर्यंतची साखळी यातून विकसीत होईल.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.