Aurangabad | पैठणमध्ये नाथषष्ठीसाठी येणाऱ्या भाविकांना कोविड लस आवश्यक, जिल्हाधिकाऱ्यांनी काय दिल्या सूचना?

Aurangabad | पैठणमध्ये नाथषष्ठीसाठी येणाऱ्या भाविकांना कोविड लस आवश्यक, जिल्हाधिकाऱ्यांनी काय दिल्या सूचना?
पैठण येथे नाथषष्ठीसाठी दाखल झालेले वारकरी
Image Credit source: TV9 Marathi

दिंडी प्रमुखांनी पैठणमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांच्या दिंडीतील सदस्यांसह कोविड लस (Covid Vaccination) घेणे आवश्यक आहे. लस घेतल्याबाबतच्या पुराव्यासोबत ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सही सोबत असू द्यावे, अशी विनंती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नाथ मंदिर विश्वस्तांमार्फत सर्व दिंडी प्रमुख आणि भाविकांना केली आहे.

मंजिरी धर्माधिकारी

|

Mar 21, 2022 | 12:39 PM

औरंगाबादः पैठणमधील ऐतिहासिक नाथषष्ठी (Nath shashthi) उत्सावाला प्रारंभ झाला येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील लाखो भाविक पैठणच्या दिशेने निघाले आहेत. पंढरपूरमधील आषाढी यात्रेनंतर महाराष्ट्रातील ही दुसऱ्या क्रमांकाची वारी समजली जाते. दरवर्षी जवळपास 600 दिंडी दाखल होतात. यातील अनेक दिंड्या पैठणच्या (Paithan Dindi) दिशेने निघाल्यादेखील आहेत. या दिंडी प्रमुखांनी पैठणमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांच्या दिंडीतील सदस्यांसह कोविड लस (Covid Vaccination) घेणे आवश्यक आहे. लस घेतल्याबाबतच्या पुराव्यासोबत ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सही सोबत असू द्यावे, अशी विनंती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नाथ मंदिर विश्वस्तांमार्फत सर्व दिंडी प्रमुख आणि भाविकांना केली आहे. त्याचबरोबर शासनाने सांगितलेल्या कोविड नियमांचे पालन करण्याच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून नाथ षष्ठी सोहळ्यास परवानगी देण्यात येत असल्याचेही चव्हाण म्हणाले. कोविड संकटामुळे मागील दोन वर्षांपासून पैठणमधील नाथषष्ठीचा उत्सव पार पडला नव्हता. मात्र यंदा कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा उत्सव भरवण्यास परवानगी दिली असून कोरोनाची नियमावली तंतोतंत पाळण्याचे आदेश स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना दिले आहेत. या सूचना पुढील प्रमाणे-

  1.  नाथषष्ठीनिमित्त 20 ते 25 मार्च या कालावधीत पैठणमधील चार विविध ठिकाणी लसीकरण पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
  2. उत्सवाच्या ठिकाणी 20 व्हॅक्सीनेटर एकाच वेळी लस देऊ शकतील, अशी यंत्रणा आरोग्य विभागाने तयार करावी.
  3. याशिवाय 10 व्हॅक्सीनेटर अधिक असतील, याचीही व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
  4.  पैठणमध्ये भाविक दाखल होण्यास सुरूवात होत असल्याने पाटबंधारे विभागाने 20 ते 25 मार्च या कालावधीत गोदावरी नदीपात्रात 1.00 Mcum पाणी सोडण्यास सुरूवात करावी.
  5. यासह पोलिस यंत्रणांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवावा.
  6. वीज विभागाने लोडशेडिंग होणार नाही, याची दक्षता घेत आवश्यक त्याठिकाणी जनित्रांची व्यवस्था करावी.
  7. नगर पालिका प्रशासनाने आवश्यक त्या कामांसह स्वच्छतेवर भर द्यावा. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने औरंगाबाद-पैठण रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत.
  8. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवश्यक त्या साधनसामुग्रीसह पथके तयार ठेवावीत.
  9. आरोग्य यंत्रणांनी मुबलक औषध साठ्यांसह आरोग्य पथके नेमावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

इतर बातम्या-

Sugar Factory : महाराष्ट्रातील 13 साखर कारखान्यांची धुराडी बंद तरीही साखर उत्पादनात राज्य अव्वल स्थानी..!

Travel Tips : भारतातील या ऐतिहासिक आणि सुंदर इमारती ब्रिटिशांनी बांधल्या आहेत, जाणून घ्या!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें