Video | अंत्यविधीसाठी मृत आजीला सरणावर ठेवलं, पाणी पाजताना अचानक झाली जिवंत!

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या अंधानेर गावात अंत्यविधीसाठी थेट सरणावर ठेवलेली एक मृत वयोवृद्ध आज्जी चक्क जिवंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Video | अंत्यविधीसाठी मृत आजीला सरणावर ठेवलं, पाणी पाजताना अचानक झाली जिवंत!


औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या अंधानेर गावात अंत्यविधीसाठी थेट सरणावर ठेवलेली एक मृत वयोवृद्ध आज्जी चक्क जिवंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिजाबाई गोरे (Jijabai Gore) असं या 80 वर्षीय वयोवृद्ध आज्जीचे नाव आहे. जिजाबाई गोरे यांचे सोमवारी दुपारी निधन झाले होते. त्याच दिवशी रात्री साडेनऊ वाजता जिजाबाई यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते.

अंत्यविधीसाठी सरणावर ठेवलेल्या जिजाबाई यांच्या देहाला पाणी पाजत असतना, अचानक त्यांची हालचाल सुरु झाली आणि हे पाहताच क्षणी नातेवाईकांनी या आजीबाईंना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर जिजाबाई यांनी नातेवाईकांशी संवाद देखील साधला. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आणि आज्जी चक्क उठून बसली!

जिजाबाई गोरे या कन्नड शहरातील माजी नगरसेवक विलास गोरे यांच्या आई असून सोमवारी (2 ऑगस्ट) दुपारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. यानंतर त्यांच्या निधनाची ही बातमी फोन वरून, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईक, मित्र व गावकऱ्यांना देण्यात आली. त्यांचा अंत्यविधी येथील स्मशानभूमीत रात्री होणार असल्याचाही सर्वांना निरोप देण्यात आला.

यानंतर आजीबाईंची अंतयात्रा गावातून निघाली आणि स्मशानात पोहचली. यानंतर अंत्यविधीसाठी आजीचा देह सरणावर ठेवण्यात आला. या वेळी सरणावर गोवऱ्या देखील रचण्यात आल्या. दरम्यान अग्नी देण्यापूर्वी असलेल्या संस्काराप्रमाणे त्यांना पाणी पाजले जात होते. मात्र, या दरम्यान त्याची हालचाल दिसून आली. आणि आजीची हालचाल दिसल्यावर अग्नी थांबून आजीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

(Aurangabad The dead Jijabai Gore was laid to rest for the funeral she suddenly came alive)

हेही वाचा :

भावना गवळी कारखाना घोटाळा प्रकरणी पोलिसांना झटका, न्यायालयाकडून कारवाईचं शपथपत्र देण्याचे आदेश

VIDEO | औरंगाबादमध्ये तिरप्या बसचा थरार, अनेक दुचाक्यांना धक्के, बाईकस्वार जखमी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI