Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या प्रकृती सुधारणेसाठी कार्यकर्त्याचे व्रत, भगवान गडापर्यंत पायी मशालीची वारी

या कार्यकर्त्याने भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने धनंजय मुडेंच्या आरोग्यासाठी साकडे घातले. नेत्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत सदर तरुणाने नेता आणि कार्यकर्त्याच्या नात्यातील निरपेक्षतेचे दर्शन घडवले.

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या प्रकृती सुधारणेसाठी कार्यकर्त्याचे व्रत, भगवान गडापर्यंत पायी मशालीची वारी
धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता देवा ढाकणे
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 9:44 AM

बीड : काही नेते व कार्यकर्ते यांचे नाते अतिशय जीवाभावाचे असते याचा प्रत्यय नुकताच बीड जिल्ह्यात आला. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. त्यांना चार दिवस रुग्णालयातदेखील (Mumbai Hospital) ठेवण्यात आले होते. मात्र नेत्याची प्रकृती अस्वस्थ असताना इकडे बीडमधील कार्यकर्त्याच्या मनातही घालमेल होऊ लागली. तसं तर बीडमधील अनेक कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत (Good Health) लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी देवाला साकडं घातलं होतं. पण एका कार्यकर्त्याने आपण आणखी काही व्रत करावं, असं ठरवलं आणि तो तब्बल 150 किलोमीटरचा प्रवास करत मशाल हाती घेऊन तो थेट भगवान गडावर दाखल झाला. धनंजय मुंडे ठणठणीत बरे व्हावे यासाठी भगवान बाबांकडे त्यानं प्रार्थना केली.

कंडारी खुर्द ते भगवान गडापर्यंत उन्हात प्रवास

राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे हे आजारी असून रुग्णालयात दाखल आहेत असल्याचं कळताच बीड तालुक्यातील कंडारी येथील देवा ढाकणे हा तरुण अस्वस्थ झाला. आपल्या नेत्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, नेत्याच्या दीर्घायुष्यासाठी एखादे व्रत केले पाहिजे, असा विचार करत त्याने भगवान गडापर्यंत मशाल हातात घेऊन पायी जाण्याचा निर्णय घेतला. कंडारी खुर्द ते भगवानगड असा 150 किलोमीटरचा पायी प्रवास करत या तरुणाने गड गाठला. मराठवाड्यातील उन्हाचा पारा आधीच चढलेला आहे. एवढ्या कडाक्याच्या उन्हातही या कार्यकर्त्याने स्वतःची पर्वा न करता धनंजय मुंडेंसाठी हे व्रत पूर्ण केले. भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने धनंजय मुडेंच्या आरोग्यासाठी साकडे घातले. नेत्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत सदर तरुणाने नेता आणि कार्यकर्त्याच्या नात्यातील निरपेक्षतेचे दर्शन घडवले.

डिश्चार्जनंतर धनंजय मुंडे कामावर रुजू

मागील आठवड्यात मंगळवारी 19 एप्रिल रोजी धनंजय मुंडे यांना अचानक भोवळ आली होती. अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अधिक तणावामुळे त्यांना थकवा आला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. चार दिवस उपचार झाल्यानंतर त्यांना डिश्चार्ज देण्यात आला. त्यानंतर दोनच दिवसात त्यांनी नियमित कामांना सुरुवात केली. सोमवारी धनंजय मुंडे मंत्रालयात कामावर रुजू झाले.

इतर बातम्या-

रजनी कुडाळकर आत्महत्येप्रकरणी नवा ट्विस्ट! रजनी कुडाळकरांच्या आत्महत्येला जबाबदार असणारी महिला कोण?

Sankashti Chaturthi 2022 | अंगारकी चतुर्थी निमित्त ‘दगडूशेठ’ गणपतीला स्वराभिषेक

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.