Aurangabad: शाळांमध्ये किलबिलाट, काळजी अन् आनंदाची संमिश्र भावना, मराठवाड्यात काय आहे स्थिती?

सोमवारपासून शाळा सुरु होणार असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील शाळांनी शनिवार आणि रविवारीही खोल्यांची साफ-सफाई, सॅनिटायझेशन करुन घेतले. शाळांच्या प्रवेशद्वारावर तापमान तपासणी, मास्कचा वापर, सॅनिटायझर याबाबत खबरदारी घेतली जात आहे.

Aurangabad: शाळांमध्ये किलबिलाट, काळजी अन् आनंदाची संमिश्र भावना, मराठवाड्यात काय आहे स्थिती?
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 10:42 AM

औरंगाबाद: राज्यात आज (04 ऑक्टोबर)पासून शाळा सुरु झाल्या (School reopen) आहेत. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत. या दृष्टीकोनातून विविध जिल्ह्यांनी राज्य सरकारच्या (Maharashtra state) नियम व अटींचे पालन करत, शाळांमध्ये मुलांचे स्वागत केले. मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेडसह औरंगाबादेतील शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे राज्य शासनातर्फे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, एवढे दिवस घरात डांबून ठेवलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळेत जाताना खूप आनंद दिसत होता तर मुलांच्या काळजीच्या दृष्टीने पालक आणि शाळा व्यवस्थापनात काहीसे भीतीचे वातावरणही दिसून आले.

औरंगाबाद: शनिवार-रविवारीही साफ-सफाई

औरंगाबाद शहरातील 365 शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना विविध सूचना केल्या आहेत. औरंगाबाद शहरात आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या 413 शाळा आहेत. फक्त आठवीचा वर्ग असलेल्या 393 शाळा आहेत. शहरातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 98,000 एवढी आहे. आठवी ते दहावीची विद्यार्थी संख्या 68,332 एवढी आहे. तर अकरावी व बारावीचे विद्यार्थी 30,680 एवढे आहेत. सोमवारपासून शाळा सुरु होणार असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील शाळांनी शनिवार आणि रविवारीही खोल्यांची साफ-सफाई, सॅनिटायझेशन करुन घेतले. शाळांच्या प्रवेशद्वारावर तापमान तपासणी, मास्कचा वापर, सॅनिटायझर याबाबत खबरदारी घेतली जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

जालना: जिल्ह्यातील ग्रामीण 1624 तर शहरी 115 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची किलबिल सुरु होणार आहे. त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी बैठत घेऊन नियोजन जाणून घेतले. बैठकीत जि.प. चे सीईओ, शिक्षणाधिकारी, शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सहभागी करण्यात आले होते.

परभणी: परभणीतील शहरी भागातील 521 तर ग्रामीण भागात 1327 शाळा झाल्या आहेत. जिल्ह्यातील शाळांमध्ये एका बाकावर एक विद्यार्थी झिकझॅक पद्धतीने बसवला जाईल. बहुतांश शिक्षकांचे लसीकरण झाल्याचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी सांगितले.

नांदेड: जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण 3 हजार 731 शाळा आहेत. त्यापैकी जि.प.मार्फत चालवल्या जाणाऱ्या 2 हजार 198 शाळा आहेत. जि.प. शाळांतील 24 हजार शिक्षक असून पाचवी ते बारावीचे साडेसहा लाखकांच्या आसपास विद्यार्थी आहेत. जि. प. शाळेतील 87 टक्के शिक्षकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत.

लातूरः जिल्ह्यात 878 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. सध्या 107 शाळा सुरु आहेत. पाचवी ते बारावीचे 3 लाख 13 हजार 188 विद्यार्थी आहेत. आरटीपीसीआर चचणी झालेल्या शिक्षकांनाच वर्गावर पाठवण्यात येणार असून बहुतांश शिक्षकांची चाचणी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीड: जिल्ह्यात शहरी भागात 255 तर ग्रामीण भागातील 1846 अशा एकूण 2101 शाळा सुरु होणार आहेत. जिल्ह्यात 11 हजार शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. शाळांचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे स्कॅनिंग केली जात आहे.

उस्मानाबाद: जिल्ह्यात एकूण 1100 शाळा सुरु करण्याचे नियोजन आहे. साळेत येणाऱ्या 95% शिक्षकांचे लसीकरण झाल्याचे उस्मानाबादेतल्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच शाळा सॅनिटाइझ करून प्रत्येक बाकावर एक विद्यार्थी बसेल, अशी सोय करण्यात आली आहे.

हिंगोली: जिल्ह्यात ग्रामीण भागातील 750 तर 57 खासगी शाळा सुरु होणार आहेत. या शाळांमधून सुमारे तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिल्या दिवशी 75 हजार ते एक लाख विद्यार्थी शाळेत येतील, असा अंदाज आहे. जिल्ह्यातील साडे तीन हजार शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले असून विद्यार्थ्यांकडूनही खबरदारी बाळगण्यात येत आहे. (Beginning of offline education in schools in 8 districts of Marathwada, read detailed information)

इतर बातम्या- 

Mumbai School Reopen : मुंबईत शाळा सुरु, एका बेंचवर एक विद्यार्थी, पालकांची संमती आवश्यक, वाचा काय काय नियम

Maharashtra School Reopen : सुरक्षितपणे शाळा कशी सुरु करायची? टास्क फोर्स मार्गदर्शन करणार, वेबिनार कुठं पाहायचं?

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.