AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Updates | औरंगाबादेत आजपासून हॉटेलवरील वेळांचे निर्बंध हटले, शहरात आणखी काय काय सुरळीत होणार?

औरंगाबादमधील हॉटेल्समध्ये 50 टक्के टेबलवरच फूड सर्व्हिस देण्याचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र हॉटेल सुरु राहण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. - हॉटेल्स 11 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर सुरु राहिलेल्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात येईल.

Corona Updates | औरंगाबादेत आजपासून हॉटेलवरील वेळांचे निर्बंध हटले, शहरात आणखी काय काय सुरळीत होणार?
सांकेतिक छायाचित्र
| Updated on: Feb 09, 2022 | 2:20 PM
Share

औरंगाबादः कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron variant) धोका ओळखून आणि राज्य सरकारने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध हॉटेल्स आणि आस्थापना 50 टक्के क्षमतेतच सुरु ठेवण्याची अट घातली होती. यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांच्या (Hotels in Aurangabad) उदयोगावर परिणाम होत होता. तसेच हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचेही निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आजपासून म्हणजेच 9 फेब्रुवारी पासून जिल्ह्यातील हॉटेल्सच्या वेळा वाढवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्याकडे मंगळवारी हॉटेल असोसिएशनची बैठक मुंबईत पार पडली. त्यानंतर जिल्ह्यात पर्यटनासह उद्योग वृद्धी व बेरोजगारी कमी करण्यासाठी हॉटेल्सच्या वेळा रात्री 11 वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्यात आणखी काय काय पूर्वपदावर?

– हॉटेल्समध्ये 50 टक्के टेबलवरच फूड सर्व्हिस देण्याचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र हॉटेल सुरु राहण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. – हॉटेल्स 11 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर सुरु राहिलेल्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात येईल. – आजापासून शहरातील पर्सिद्ध सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय देखील सुरु करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. महापालिकेला येथील तिकिटापोटी दररोज एक लाख रुपये येतात. त्यामुळे आता उद्यानदेखील पूर्वीप्रमाणे सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. – शहरातील शाळांचे पाचवी ते सातवीचे वर्ग मंगळवारपासून सुरु झाले आहेत. शाळांमध्ये सुरुवातीला 30 टक्केच उपस्थिती दिसून आली. मात्र हळू हळू विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

-लसीकरणाबाबतचे नियम सर्वच ठिकाणी तसेच ठेवण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावण्यासाठी कोरोना लसीचे एक किंवा दोन डोस घेणे बंधन कारक करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती काय?

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या काहीशी वाढलेली दिसून आली. मंगळवारी जिल्ह्यात 158 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यापैकी शहरात 108 तर ग्रामीण भागात 50 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. शहरात मागील 24 तासात दोन जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.

मराठवाड्यातील कोरोना स्थिती काय?

मंगळवारी म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी मराठवाड्यात आढळून आलेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे- जालना- 43 परभणी- 89 नांदेड-131 हिंगोली- 142 बीड- 115 लातूर- 157 उस्मानाबाद- 137

इतर बातम्या-

द्राक्षांच्या घडांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांसमोर नवीन संकट; आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता

अंकिता जळीतकांड प्रकरण : आरोपीला दोषी ठरविल्याने आई-वडील समाधानी, तर बचाव पक्षाची तयारी काय?

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...