AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या जेजे हॉस्पिटलसाठी कंत्राट मिळवून देतो म्हणत औरंगाबादेत ‘नैवेद्य’ हॉटेल मालकाला 41 लाखांचा गंडा!

पाढी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी 2021 पासून आतापर्यंत केवळ डिपॉझिटच्या नावाखाली या लोकांना 41 लाख 5 हजार रुपये उकळले. मात्र त्या बदल्यात कोणतेही टेंडर मिळाले नाही. पैसे परत मागितल्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. तसेच पाढी यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली.

मुंबईच्या जेजे हॉस्पिटलसाठी कंत्राट मिळवून देतो म्हणत औरंगाबादेत 'नैवेद्य' हॉटेल मालकाला 41 लाखांचा गंडा!
सांकेतिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 11:28 AM
Share

औरंगाबादः मुंबईच्या जेजे हॉस्पिटलच्या (J J Hospital, Mumbai) 4 हजार लोकांच्या जेवणाचे कंत्राट मिळवून देतो, असे अमिष दाखवत औरंगाबादमधील प्रसिद्ध नैवेद्य हॉटेल (Naivedya Hotel) मालकाला लाखो रुपयांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे कंत्राट मिळवून देण्यासाठी 70 ते 80 लाख रुपये अनामत द्यावे लागतील, असे हॉटेल मालकांना सांगण्यात आले. त्यानुसार नैवेद्य हॉटेलचे मालक भक्तबंधू रामचंद्र पाढी यांना 41 लाख 5 हजार रुपयांना फसवण्यात आले. या प्रकरणी आता एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात (CIDCO police station) तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकजण औरंगाबाद, दुसरा मुंबई तर तिसरा नाशिक येथील रहिवासी आहे.

कशी केली फसवणूक?

एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी रजनी रानमारे (प्रतापनगर, औरंगाबाद), संदीप बाबुलाल वाघ (मुलुंड, मुंबई) आणि स्वप्नील भरत नांद्रे (नाशिक) या तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात आरोपींनी पाढी यांना विश्वासात घेून आमची आर.बी. केटरर्स व फूड सप्लायर्स या नावाने 12 स्वरुप निकेतन, बामणवाडा, अंधेरी प. येथे फूड सप्लायची फर्म असल्याचे सांगितले. याद्वारे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मोठमोठी सरकारी कार्यालये, हॉस्पिटलच्या कँटीनला अन्नपुरवठा करण्याचे टेंडर घेऊन त्यांना जेवण पुरवण्याचे काम करतो, असे सांगितले. तुम्हाला मुंबईतील जे जे हॉस्पिटल येथे 4 हजार लोकांना जेवण पुरवण्याचे काम करायचे का, असे विचारले. मात्र त्यासाठी डिपॉझिट भरण्याची अट घातली.

जानेवारी 2021 पासून आतापर्यंत 41 लाख उकळले

पाढी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी 2021 पासून आतापर्यंत केवळ डिपॉझिटच्या नावाखाली या लोकांना 41 लाख 5 हजार रुपये उकळले. मात्र त्या बदल्यात कोणतेही टेंडर मिळाले नाही. पैसे परत मागितल्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. तसेच पाढी यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. अखेर या सर्व प्रकाराविरोधात पाढी यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरुन पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.

इतर बातम्या-

Kolhapur Exam | परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, विद्यार्थ्यांचं मत काय? जाणून घ्या

कंगना रनौतचा थेट कॅनडाच्या पंतप्रधानांवर निशाणा, म्हणाली, ‘कर्माची फळं भोगावी लागतील’

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.