आता लसीकरण केंद्रावर येण्याची गरज नाही?, घरोघरी होणार लसीकरण; लाभ कुणाला?, वाचा सविस्तर!

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. आता घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र घरी जाऊन सरसकट लसीकरण करण्यात येणार नाही. (vaccination centres)

आता लसीकरण केंद्रावर येण्याची गरज नाही?, घरोघरी होणार लसीकरण; लाभ कुणाला?, वाचा सविस्तर!
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 6:46 PM

जालना: राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. आता घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र घरी जाऊन सरसकट लसीकरण करण्यात येणार नाही. जे लोक व्याधींमुळे किंवा इतर कारणाने घरातून बाहेर पडूच शकत नाही, अशा लोकांचं घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकांना लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर येण्याची गरज राहणार नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. (Home Vaccination in maharashtra for those who can’t reached at vaccination centres )

राजेश टोपे आज जालन्यात होते. आता घराघरात जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या या मोहिमेचा लाभ सर्वांना मिळणार नाही. जे लोक घरातून बाहेर येऊ शकत नाही, अशांना घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळा प्रोटोकॉल तयार करण्यात येणार आहे. जे शारीरिक व्याधीमुळे घराबाहेर पडू शकत नाहीत, अशा लोकांच्या कुटुंबानी लेखी लिहून देणं बंधनकारक आहे. तसेच फॅमिली डॉक्टरचे सर्टिफिकेटही देणे गरजेचे असणार आहे. तरच घरी येऊन लस दिली जाणार आहे, असं टोपे म्हणाले. घरी जाऊन लसीकरण करण्याचं हे काम टास्क फोर्सला देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

दानवेंना उत्तर

दरम्यान, लस खरेदीसाठी ठाकरे सरकारने सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी घेतल्याने सरकारने हे सात हजार कोटी रुपये आता शेतकऱ्यांसाठी वापरावेत, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यावर टोपे यांनी पलटवार केला आहे. सात हजार कोटी ही तुटपुंजी रक्कम आहे. शेतकऱ्यांची आम्ही नेहमी काळजी घेत आलो आहोत. राज्य शासन जनतेच्या सेवेसाठी सदैव सज्ज आहे, असं त्यांनी सांगितलं.

राज्यातील कोरोनाची सध्यस्थिती

राज्याच्या विविध जिल्ह्यांतील कोव्हिड-19 पॉझिटीव्हीटीचा वेग आणि वापरात असलेल्या ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा यांच्या आधारे लागू करण्यात येणाऱ्या बंधनांच्या स्तरांविषयी निर्देश दिले आहेत. सदर आदेशातील अनुच्छेद 4 मध्ये राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणाची व्याख्या दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 10 जून 2021 रोजी संपूर्ण राज्यात रुग्णांद्वारे वापरात असलेल्या ऑक्सिजनयुक्त खाटांची एकूण संख्या 20,697 इतकी असून ही संख्या घट दर्शवणारी आहे. ही संख्या 35,000 पेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही.

या जिल्ह्यांमध्ये अनलॉकची शक्यता

अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नंदूरबार, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, सिंधुदुर्ग. (Home Vaccination in maharashtra for those who can’t reached at vaccination centres )

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : सिंधुदुर्गमध्ये मागील पाच दिवसांत 40 जणांचा मृत्यू

कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही; आरोग्य विभागाची माहिती

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यापासून अनलॉकची शक्यता, तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का?

(Home Vaccination in maharashtra for those who can’t reached at vaccination centres )

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.