Railway: लातूरमध्ये उद्या रेल्वेची महत्त्वाची बैठक, वाचा मराठवाडा जनता विकास परिषदेच्या काय आहेत मागण्या?

औरंगाबाद: मराठवाड्यातील सर्व खासदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी 20 ऑक्टोबर रोजी रेल्वेसंदर्भात बैठक लातूर इथं होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा जनता विकास परिषदेने (Marathwada Janata vikas Parishad) रेल्वे विकासाचा अनुशेष मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत 21 मागण्यांसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना साकडे घातले आहे. नांदेड विभाग मध्य रेल्वे मुंबई […]

Railway: लातूरमध्ये उद्या रेल्वेची महत्त्वाची बैठक, वाचा मराठवाडा जनता विकास परिषदेच्या काय आहेत मागण्या?
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 4:44 PM

औरंगाबाद: मराठवाड्यातील सर्व खासदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी 20 ऑक्टोबर रोजी रेल्वेसंदर्भात बैठक लातूर इथं होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा जनता विकास परिषदेने (Marathwada Janata vikas Parishad) रेल्वे विकासाचा अनुशेष मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत 21 मागण्यांसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना साकडे घातले आहे. नांदेड विभाग मध्य रेल्वे मुंबई झोनला जोडल्यास मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांतील 1100 किमीचा रेल्वेमार्गाचा विकास होईल, या मागणीकडे लक्ष वेधले आहे. दानवे यांच्या रुपाने मराठवाड्याला प्रथमच रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष शिवाजी नरहरे (Shivaji Narhare) यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले आहे. यात पुढीलप्रमाणे मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

  •  नांदेड रेल्वे विभाग मध्य रेल्वे झोन मुंबईमध्ये समाविष्ट केल्यास मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांतील 1100 किमी रेल्वेमार्गाचा विकास होऊ शकतो.
  • लॉकडाऊनपूर्वी लातूरवरून 22, परभणीवरून 30, नांदेडवरून 45, औरंगाबादवरून 30 रेल्वेसेवा होत्या. त्या पूर्वीप्रमाणे सुरु कराव्यात.
  • याच रेल्वेला विशेष रेल्वे सांगून विभागाने दरवाढ केली आहे. ही जनतेची लूट थांबवण्यात यावी.
  • अनेक रेल्वे गाड्या संथ गतीने धावतात. त्या 40 किमी प्रति तासाप्रमाणे धावतात. त्यात बदल करावा.
  • मराठवाड्यातील मंजूर झालेले सर्व रेल्वे मार्गांचे काम सुरु करावे. त्यात लातूर रोड-अहमदपूर-लोहा नांदेड, लातूर-निलंगा-उमरगा-गुलबर्गा, उस्मनाबाद-तुळजापूर-सोलापूर, लातूररोड-जळकोट-बोधन, लातूर-रेणापूर-पानगाव या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेसाठी मंजुरी द्यावी.
  • सर्व स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 500 मीटर लांबीचे असावेत.
  • औरंगाबाद ते दिल्ली नवीन रेल्वे सेवा सुरु करावी.
  • हिंगोली-मुंबई नवीन रेल्वे सेवा सुरू करावी.
  • पूर्णा ते गोवा त्रिवेंद्रम नवीन रेल्वे सुरु करावी.
  • औरंगाबाद-जालना-परभणी-परळी-लातूर-उस्मानाबाद-कुर्डुवाडी-मिरजमार्गे गोवा-बेंगलोर-त्रिवेंद्रम नवीन रेल्वे सेवा सुरु करावी.
  • शिर्डी-औरंगाबाद-जालना-परभणी-उदगीरमार्गे तिरुपती गाडी सुरु करावी.
  • सर्व रेल्वेमार्ग दोन पदरी करावे व त्यांचे विद्युतीकरण करावे.
  • सर्व रेल्वेस्थानकांचा विस्तार व आधुनिकीकरण करावे.
  • जालना येथे ड्रायपोर्टचे काम चालू आहे. तेथे 500 ट्रकसाठी टर्मिनलचे काम सुरु करावे. तसेच रेल्वेच्या हेवी क्रेनची सुविधा निर्माण करावी. आदी मागण्या रावसाहेब दानवे यांच्यासमोर मांडल्या जाणार आहेत.

इतर बातम्या-

VIDEO | अंबरनाथ रेल्वे स्थानकात तरुणाला हृदयविकाराचा झटका, रेल्वे पोलिसाने सीपीआर देत वाचवले प्राण

Railway Jobs : ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन, 10 वी पास उमेदवारांना उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिसची संधी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.