AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत संत एकनाथ रंगमंदिराच्या देखभालीसाठी लाखोंची बोली, प्रशांत दामलेंच्या संस्थेकडून 80 लाख देण्याची तयारी

छाननी अंती प्रशांत दामले यांच्या दौरी थिएटरने सर्वाधिक निधी देण्याची तयारी दाखवली आहे. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी आलेल्या प्रस्तावाची माहिती घेतली. मालमत्ता विभागाकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

औरंगाबादेत संत एकनाथ रंगमंदिराच्या देखभालीसाठी लाखोंची बोली, प्रशांत दामलेंच्या संस्थेकडून 80 लाख देण्याची तयारी
संत एकनाथ रंगमंदिर, औरंगाबाद
| Updated on: Jan 30, 2022 | 2:00 AM
Share

औरंगाबादः महापालिकेने 8 कोटी रुपये खर्च करून संत एकनाथ रंगमंदिराचं (Sant Eknath Rangmandir) नुतनीकरण केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीनं तसंच पालकमंत्री आणि जिल्ह्यातील इतर नेते-मंत्र्यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या रंगमंदिराचं उद्घाटनदेखील झालं. आता या मंदिराच्या देखभालीसाठीची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली आहे. रंगमंदिराची देखभाल करु इच्छिणाऱ्या संस्थांकडून महापालिकेने (Aurangabad municipal corporation) स्वारस्यपत्र मागवण्यात आले होते. आतापर्यंत एकूण 7 संस्थांकडून स्वारस्यपत्र प्राप्त झाले असून त्यात सर्वाधिक दर प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या गौरी थिएटरचा आहे. महापालिकेला या संस्थेनं दरवर्षी 80 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे.

खासगीकरण नव्हे केअर टेकर नेमणार- महापालिका

दरम्यान, एकनाथ रंगमंदिराचे खासगीकरण करु नये, असा एक सूर निघत आहे. मात्र महापालिकेतर्फे रंगमंदिराचे खासगीकरण केले जात नसून पालिका फक्त रंगमंदिरासाठी केअर टेकर म्हणून एका संस्थेची नेमणूक करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. रंगमंदिराचा दर्जा चांगला रहावा, हा यामागचा उद्देश आहे, असे माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

वर्षाकाठी 80 लाख खर्च करण्याची तयारी

प्रशांत दामले यांच्या गौरी थिएटर्स या संस्थेने रंगमंदिराच्या देखभालीसाठी दरवर्षी 80 लाख रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. कोट्यवधी रुपये खर्च केलेले रंगमंदिर अत्यंत सुंदर आणि देखणे दिसत आहे. आता हे रंगमंदिर भविष्यातही असेत अबाधित रहावे, यासाठी महापालिकेने इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले आहेत. छाननी अंती प्रशांत दामले यांच्या दौरी थिएटरने सर्वाधिक निधी देण्याची तयारी दाखवली आहे. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी आलेल्या प्रस्तावाची माहिती घेतली. मालमत्ता विभागाकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

प्रशांत दामलेंचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

2017 साली संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरवस्थेविरोधात प्रशांत दामले यांनी एक व्हिडिओ केला होता. त्यानंतर शहरातीलही अनेक कलाप्रेमींनी हा मुद्दा उचलून धरला होता. राज्यभरात हा विषय गाजला होता. त्यामुळे आता रंगमंदिराची आणखी बदनामी होऊ नये म्हणून हे नाट्यगृह बंद करण्यात आले असून नूतनीकरणानंतरच ते खुले करण्यात आले. आता दामले यांनीच रंगमंदिर चालवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

इतर बातम्या

पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील शाळाही 1 फेब्रुवारी पासून होणार; या नियमावलीचे करावे लागणार पालन

Video : ‘त्या’ शिवसेना विभागप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.