AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठी’तून राहुल गांधी गायब? सोनिया गांधी यांच्यापासून नाना पटोले यांच्यापर्यत सर्व आहेत, पण….

एकिकडे स्व. बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, उद्धव ठाकरे, तर दुसरीकडे सोनिया गांधी, शरद पवार, अजित पवार, नाना पटोले यांची छायाचित्र आहेत. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात बोलणाऱ्या राहुल गांधी यांनाच टीझरमधून वगळण्यात आलंय.

महाविकास आघाडीच्या 'वज्रमुठी'तून राहुल गांधी गायब? सोनिया गांधी यांच्यापासून नाना पटोले यांच्यापर्यत सर्व आहेत, पण....
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 29, 2023 | 9:53 AM
Share

छत्रपती संभाजीनगर : शिंदे-भाजप युतीला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांनी वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकण्याची पूर्ण तयारी मविआने केली आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांना छत्रपती संभाजीनगरातून (Sambhajinagar) जोरदार सुरुवात होत आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. सभेसाठीचं टीझरदेखील रिलीज करण्यात आलंय. सोशल मीडियावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हा टीझर वेगाने शेअर केला जातोय. मात्र टीझरमधील राहुल गांधींच्या गैरहजेरीने नव्याने चर्चा सुरु झाली आहे.

नवा टीझर चर्चेत

महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेचा पहिला टीझर नुकताच जारी करण्यात आलाय. सध्या ज्या शब्दावरून राजकारण पेटलंय, त्या चोर शब्दाचा खुबीने यात वापर करून घेण्यात आलाय. ही जी माणसं जमलीयेत ती चोरून नेता येणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांचं भाषणातलं वाक्य वापरण्यात आलंय. तर अजित पवार तसेच नाना पटोलेदेखील टीझरमध्ये दाखवण्यात आलेत. महाविकास आघाडीची वज्रमूठ आवळली असून विराट संख्येने या सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. यानिमित्ताने कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं जातंय.

फक्त राहुल गांधी नाहीत…

महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या घटकपक्षांतील बहुतांश नेत्यांची छायाचित्र या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहेत. अखेरीस एकिकडे स्व. बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, उद्धव ठाकरे, तर दुसरीकडे सोनिया गांधी, शरद पवार, अजित पवार, नाना पटोले यांची छायाचित्र आहेत. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात बोलणाऱ्या राहुल गांधी यांनाच टीझरमधून वगळण्यात आलंय. त्यामुळे शिवसेनेची राहुल गांधींवरील नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिंदे-भाजप युतीविरोधात लढताना हिंदुत्वाचा मुद्दा वापरताना मविआकडून पूर्ण खबरदारी बाळगली जातेय. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींना टीझरमधून वगळण्यात आल्याची चर्चा आहे.

2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरातील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार तसेच नाना पटोले कुणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सावरकरांचा मुद्दा काँग्रेस वगळणार?

दरम्यान, राष्ट्रवादी काग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद मिटवण्याचे प्रयत्न केल्याचं म्हटलं जातंय. नवी दिल्लीत विरोधकांच्या बैठकीत शरद पवार यांच्या मध्यस्थीतून हा मुद्दा सोडवण्यात महाविकास आघाडीला यश आल्याचं म्हटलं जातंय. यापुढे काँग्रेसकडून सावरकरांचा मुद्दा पुन्हा उकरून काढला जाणार नाही, असं आश्वासन खुद्द राहुल गांधी यांनी दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.