AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange-Patil : अशी सभा महाराष्ट्रात झालीच नसेल… 150 एकरवर सभा… 500 फुटांच्या रॅम्पवरून एन्ट्री; अंतरवलीतील ग्राऊंड रिपोर्ट

मनोज जरांगे पाटील यांची आज दुपारी अंतरवली सराटीत सभा होणार आहे. या सभेसाठी हजारो लोक अंतरवली सराटीत दाखल झाले आहेत. या सभेला सुमारे सात लाख लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील आपली भूमिका मांडणार आहेत.

Manoj Jarange-Patil : अशी सभा महाराष्ट्रात झालीच नसेल... 150 एकरवर सभा... 500 फुटांच्या रॅम्पवरून एन्ट्री; अंतरवलीतील ग्राऊंड रिपोर्ट
Manoj Jarange PatilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2023 | 7:10 AM
Share

संजय सरोदे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, जालना | 14 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राने पाहिली नसेल अशी सभा अंतरवली सराटीत आज होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ही सभा आयोजित केली आहे. या सभेसाठी राज्यातील 123 गावांनी आर्थिक मदत केलीय. तनमनधनाने गावकरी या सभेसाठी राबत आहेत. या सभेसाठी कालपासूनच लोक अंतरवली सराटीत दाखल झाले आहेत. सभेसाठी आलेल्या लोकांनी अख्खी रात्र जागून काढली आहे. आपल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी हे लोक एकवटले आहेत. कुणबी असल्याचं सरसकट प्रमाणपत्र मिळावं हीच या सर्वांची मागणी आहे.

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटी येथे सभेचं आयोजन केलं आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात साउंड सिस्टमची व्यवस्था करण्यात आली आहे आणि ही सर्व व्यवस्था छत्रपती संभाजीनगरचे जाधव मंडप डेकोरेशनचे मालक रखमाजी जाधव यांनी केवळ समाजाचे देणं लागतं म्हणून मोफत केली आहे. जरांगे पाटील यांच्या सभेच्या ठिकाणी काल डॉग स्कॉड कडून सुरक्षा तपासणी करण्यात आली. या सभेला सुमारे सात लाख लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ही पहिलीच आणि सर्वात मोठी सभा ठरणार आहे.

ग्रँड एन्ट्री होणार

अंतरवली सराटीपासून दोन किलोमीटर अंतरावरील 150 एकर जागेवर ही सभा होणार आहे. यासभेसाठी 15 फूट उंच स्टेज बांधला आहे. सभेत मनोज जरांगे पाटील यांची ग्रँड एन्ट्री होणार आहे. त्यांच्या एन्ट्रीसाठी 500 फुटांचा रॅम्प बनवला आहे. स्टेजच्या चारही बाजूला जरांगे पाटील संवाद साधतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी असणार दिवसाची सुरुवात

मनोज जरांगे हे सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून दिवसाची सुरुवात करणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत जरांगे आंदोलन स्थळी बसून राहणार आहेत. 11 वाजता ते सभास्थळावरून शक्ती प्रदर्शन करत उघड्या जीपमधून सभेच्या ठिकाणाकडे जाणार आहेत. सभेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर रॅम्पवॉक करून मनोज जरांगे हे मंचावरती दाखल होतील. साधारणपणे एक तास भर ते भाषण करतील.

सभेची वैशिष्ट्ये

आज दुपारी 12 वाजता अंतरवली सराटीमध्ये सभेला सुरुवात होणार

150 एकर मैदानावर सभा होणार, सभेची तयारी पूर्ण

सभेसाठी 15 फूट उंचीचा स्टेज उभारण्यात आलाय

स्टेजवरून चारही बाजूने संवाद साधता येईल अशी व्यवस्था केलीय

मनोज जरांगे यांच्या एन्ट्रीसाठी 500 फुटांचा रॅम्प बनवलाय

सभेसाठी तब्बल 600 भोंग्याचा वापर

5 हजाराहून अधिक स्वयंसेवक सभेची तयारी करत आहेत

20 हजार स्वयंसेवक सभास्थळी दाखल

10 लाख पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था

123 गावांनी ही सभा आयोजित केलीय

सभेसाठी 31 गावांनी निधी उभारला. कुणी 500 रुपये दिले तर कुणी हजार

23 गावातील 31 गावांच्याच लोकांच्या खर्चात सभा होणार, उर्वरित गावांचे पैशांची गरज पडली नाही.

चार ठिकाणी 100 एकरवर पार्किंगची व्यवस्था

सभेसाठी आजपासून धुळे-सोलापूर मार्ग बंद

जालन्यात 1 हजार पोलिसांचा बंदोबस्त

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.