AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Festival Special:औरंगाबादमध्ये मावा बाटीचा स्वाद होतोय लोकप्रिय, उत्सवकाळात मागणी वाढली, मटर करंजीलाही उत्तम प्रतिसाद

हा पदार्थ मूळचा राजस्थान आणि गुजरात सीमेवरील माळवा गावातील पदार्थ आहे. दिसायला गुलाबजामून सारखा दिसत असला तरी याचा आकार बाटीसारखा तरी याचा स्वाद पूर्णपणे वेगळा आहे.

Festival Special:औरंगाबादमध्ये मावा बाटीचा स्वाद होतोय लोकप्रिय, उत्सवकाळात मागणी वाढली, मटर करंजीलाही उत्तम प्रतिसाद
राजस्थानी मूळ असलेला पदार्थ औरंगाबादमध्ये होतोय लोकप्रिय
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 2:36 PM
Share

औरंगाबादः  गरमागरम इम्रती आणि मावा जलेबीसाठी प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादमध्ये गेल्या वर्षापासून आणखी एक पदार्थ विशेष लोकप्रिय होतोय. वर्षभरात औरंगाबादमधल्या अनेक फुडींनी मावा बाटी या आणखी एका नव्या पदार्थाचा स्वाद चाखलाय आणि अनेकजण या पदार्थाच्या प्रेमातही पडलेत.  मूळ राजस्थानमधील (Rajasthan Mawa Bati) असलेल्या या पदार्थाचा स्वाद औरंगाबादमधील खवैय्यांना (Aurangabad Food) चाखायला मिळतोय. शहरातीलच एका फुडी मैत्रिणीने औरंगाबादकरांना या पदार्थाची ओळख करुन दिली. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात जेव्हा लोक घरात अडकून होते, तेव्हा इतर पदार्थांप्रमामेच तिने हा पदार्थ विक्री करण्यास सुरुवात केली. शहरातील अस्सल खवय्यांच्या नजरेत तो चांगलाच लक्षात राहिला. वर्षभरात पाहता पाहता या मैत्रिणीच्या मावा बाटीला शहरात चांगलीच मागणी वाढली आहे.

मूळ राजस्थानमधल्या माळव्यातला पदार्थ

हा पदार्थ मूळचा राजस्थान आणि गुजरात सीमेवरील माळवा गावातील पदार्थ आहे. दिसायला गुलाबजामून सारखा दिसत असला तरी याचा आकार बाटीसारखा तरी याचा स्वाद पूर्णपणे वेगळा आहे. खवा, बाईंडींगसाठी मैदा घालून केलेल्या या बाटीत ड्रायफ्रूटचा स्वाद विशेष लागतो. तुपात किंवा तेलात  मस्त खरपूस रंगात ही बाटी तळली जाते. त्यानंतर ती केसर सिरपमध्ये भिजवली जाते. केसर सिरपमुळेही या बाटीला अफलातून चव मिळते. उत्तर भारतात हा पदार्थ विशेष लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात पुण्यातही काही ठिकाणी मावा बाटीची चव चाखायला मिळते.

युट्यूबला पाहिला अन् प्रयोग केला

औरंगाबादमधीलच एक खवैय्या असलेली मैत्रीण म्हणजे नितीशा स्मार्त. कोरोना काळातच पावभाजी, समोसे, कचोरी यासारख्या पदार्थांची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. पण एका ग्राहकाने तिला मावा बाटीची ऑर्डर दिली. नितीशाने हा पदार्थ कधी केला नव्हता आणि त्याचा स्वादही घेतला नव्हता. युट्यूबवर पाहून तिने प्रथमच बनवलेली मावा बाटी ग्राहकाला प्रचंड आवडली. त्यानंतर पुण्यात गेल्यावर तिने एका ठिकाणी मावा बाटीची चव चाखली. नितीशाने बनवलेली आणि या बाटीची चव हुबेहुब तशीच होती. त्यानंतर तिने या पदार्थाच्या आणखी ऑर्डर स्वीकारायला सुरुवात केली. बघता बघता या पदार्थाची लोकप्रियता वाढतच गेली. आता तर वाढदिवस असो, फॅमिली फंक्शन असो की लहान-मोठी पार्टी असो अनेक लोकांकडून एकाच वेळी ५० ते १०० माना बाटींची ऑर्डर दिली जाते. यासोबतच नितीशाने मटार करंजी हा खमंग पदार्थ ठेवल्यामुळे या दोन्हीचे कॉम्बिनेशन विशेष साजेशे ठरतेय.

तोंडात टाकताच विरघळते…

मावा बाटी चवीला अप्रतिम लागते. तोंडात टाकताच विरघळते. पण हेवी असल्याने एकजण एका वेळी दोनच बाट्या खाऊ शकतो. एका बाटीची किंमत 25 रुपये आहे. तुपात तळलेली बाटी 550 रुपये किलो तर तेलात तळलेली बाटी 480 रुपये किलो अशा दराने विकली जाते. एका किलोमध्ये साधारण 20 बाट्या येतात. गेल्या वर्षभरातच अशा 5000 हजारांपेक्षा जास्त बाट्या विक्री झाल्याचे नितीशा सांगते. त्यामुळे शहरात लोकप्रिय होत असलेल्या या बाटीला आता गणेशोत्सव काळातही चांगलीच मागणी आहे.

इतर बातम्या-

Aurangabad Gold Update: औरंगाबादेत चांदी चांगलीच चकाकली, 1000 रुपयांनी महागली, सोन्यातही 500 ची वाढ

इम्तियाज जलील म्हणाले, बाप्पा संपूर्ण जगावरील कोरोनाचे विघ्न दूर करो… तर माजी खासदार खैरे म्हणाले, कोरोना पाकिस्तानात जावो…

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.