Aurangabad | औरंगाबादच्या सभेच्या निमंत्रण पत्रिकेचे Raj Thackeray यांच्या हस्ते अनावरण, 13 पेक्षा जास्त संघटना विरोधात, पोलिसांसमोर आव्हान!

औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली नाही तरीही ही सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाऐवजी गरवारे स्टेडियमवर घ्यावी, अशी सूचना केली होती. तसेच ही सभा एक तारखे ऐवजी रमजान नंतर घेण्यात यावी अशी सुद्धा मागणी केली. मात्र या मागणीला सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महत्त्व दिले नाही.

Aurangabad | औरंगाबादच्या सभेच्या निमंत्रण पत्रिकेचे Raj Thackeray यांच्या हस्ते अनावरण, 13 पेक्षा जास्त संघटना विरोधात, पोलिसांसमोर आव्हान!
राज ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद सभेच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरणImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 6:59 PM

औरंगाबादः औरंगाबाद शहरात होणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला पोलिसांची अजूनही परवानगी मिळालेली नाही, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रिका छापल्या असून राज ठाकरे यांच्या हस्ते पत्रिकेचा (Aurangabad Rally invitation card) अनावरण करण्यात आले. आता औरंगाबाद शहरामध्ये या पत्रकांचे वाटप सुद्धा करण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे नेते नितीन सरदेसाई,मनसे नेते शिरीष सावंत, मनसे नेते अविनाश अभंयकर,मनसे नेते दिलीपबापू धोत्रे,सरचिटणीस संदीप देशपांडे इत्यादी उपस्थित होते. एकिकडे राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेची जय्यत तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमधील अनेक संघटनांनी राज ठाकरे यांच्या सभेला विरोध दर्शवला आहे.

13 पेक्षा जास्त संघटनांचा विरोध

शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. तशी परवानगी मागणारे पत्रही औरंगाबाद पोलीस आयुक्तांना मनसेतर्फे देण्यात आले आहे. मात्र ही सभा या ठिकाणी होऊ नये, महाराष्ट्र दिनी 01 मे रोजी होऊ नये, अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे. मुस्लिम नुमाइंदा कौंसिल, वंचित बहुजन आघाडी, मौलाना आझाद विचार मंच, ऑल इंडिया पँथर सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, गब्बर अॅक्शन संघटना आदी जवळपास 13 संघटनांनी पोलिसांकडे तसे पत्र दिले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी द्यावी की नाही, असा पेच पोलिसांसमोर आहे.

‘परवानगी मिळाली नाही तरी सभा होणारच’

औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली नाही तरीही ही सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाऐवजी गरवारे स्टेडियमवर घ्यावी, अशी सूचना केली होती. तसेच ही सभा एक तारखे ऐवजी रमजान नंतर घेण्यात यावी अशी सुद्धा मागणी केली. मात्र या मागणीला सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महत्त्व दिले नाही. त्यामुळे ही सभा ठरल्यावेळी ठरल्या तारखेला आणि ठरल्या ठिकाणी होण्याची शक्यता दिसते आहे.

भोंग्यांच्या इशाऱ्याचं काय?

येत्या 03 मे पर्यंत राज्यातील मशिदींवरचे भोंगे काढण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सर्वपक्षीय बैठक घेत, भोंगे हटवण्याचा कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र विविध धार्मिक स्थळांनी इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सामाजिक शांतता भंग झाल्यास स्थानिक पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. यानंतरही मनसे भोंग्यांबाबतच्या निर्णयावर ठाम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

इतर बातम्या-

Devendra Fadnavis Video : राणे साहेब या ना, या, प्रेस कॉन्फरन्स थांबवत फडणवीसांनी ‘ती’ खुर्ची राणेंना दिली, दरेकरांची जागा बदलली

TOP 9 Headlines | 25 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.