VIDEO: दोनदा वाळू ट्रक अंगावर घालण्याचा प्रयत्न, तरीही अधिकाऱ्यांकडून 12 किमी पाठलाग, औरंगाबादमधील थरार कॅमेरात कैद

नदीतील वाळू चोरणाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध इतके मोठे असतात की अनेकदा दिवसाढवळ्या सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू चोरीलाही लगाम लावता येत नाही. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात प्रशासनाने चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा तब्बल 12 किलोमीटर पाठलाग करून ट्रक पकडला.

VIDEO: दोनदा वाळू ट्रक अंगावर घालण्याचा प्रयत्न, तरीही अधिकाऱ्यांकडून 12 किमी पाठलाग, औरंगाबादमधील थरार कॅमेरात कैद
Aurangabad Sand thief truck
दत्ता कानवटे

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 12, 2021 | 7:57 AM

औरंगाबाद : नदीतील वाळू चोरणाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध इतके मोठे असतात की अनेकदा दिवसाढवळ्या सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू चोरीलाही लगाम लावता येत नाही. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात प्रशासनाने चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा तब्बल 12 किलोमीटर पाठलाग करून ट्रक पकडला. वैजापूरचे उपविभागीय अधिकारी दीपक त्रिभुवन आणि माणिक आहेर या दोन अधिकाऱ्यांनी हा ट्रक पकडला.

विशेष म्हणजे ट्रक चालकाने दोन वेळा हा ट्रक या अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही न घाबरता ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला. शेवटी एका शेतात जाऊन हा ट्रक थांबला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हा ट्रक ताब्यात घेऊन त्यावर 2 लाख 72 हजारांचा दंड ठोठावला. या ट्रकचा पाठलाग करून ट्रक ताब्यात घेण्याची थरारक दृष्यं मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालीत.

पाठलाग करताना ट्रक चालकाला वारंवार सांगूनही थांबला नाही

वाळू माफियांच्या या पाठलागाच्या व्हिडीओत संबंधित चालकाला अधिकारी वारंवार थांबायला सांगत असूनही तो थांबला नाही हे स्पष्ट दिसतंय. सुरुवातीला हा वाळू ट्रक मुख्य डांबरी रस्त्यानं धावत होता, नंतर तो आडमार्गाने घालण्यात आला. निर्जन रस्त्यावर ट्रक नेल्यानं तरी अधिकारी घाबरतील असा चालकाचा कयास होता. मात्र, निडर कर्मचाऱ्यांनी ट्रकचा पाठलाग सुरूच ठेवला. अखेर चालकाला एका शेतात ट्रक थांबवावा लागला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

अवैध रेती साठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांची धाड, अडीच कोटींचा साठा जप्त

Sand thief try to kill despite government officer chess them 12 Km in Aurangabad

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें