School: कारवाई झाली तरी चालेल, सोमवारपासून शाळा सुरू करणार; इंग्रजी शाळांच्या मेस्टा संघटनेचा आक्रमक पवित्रा!

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरांतील सर्वच शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र महाराष्ट्र इंग्रजी शाळांची संस्था मेस्टाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरु करणारच असा इशारा दिलाय.

School: कारवाई झाली तरी चालेल, सोमवारपासून शाळा सुरू करणार; इंग्रजी शाळांच्या मेस्टा संघटनेचा आक्रमक पवित्रा!
सोमवारपासून शाळा सुरु करण्यावर मेस्टा आणि संस्था चालकांचे एकमत
मंजिरी धर्माधिकारी

|

Jan 13, 2022 | 9:47 AM

औरंगाबादः महाराष्ट्रात वेगानं फैलावणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आता पुन्हा शाळा बंद केल्याने विद्यार्थी मागे राहतील. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण (Online School) घेता येत नाही. आम्हालाही विद्यार्थ्यांची काळजी आहे. शाळा पूर्ण निर्जंतूक केल्यानंतरच आम्ही शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ, पण शाळा सुरु करूच (School reopen). यासाठी आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल, अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (MESTA) ने घेतली आहे.

मेस्टाने घेतली संस्थाचालकांची बैठक

11 आणि 12 जानेवारी रोजी मेस्टा संस्थेने शाळांच्या संस्थाचालकांची बैठक घेतली. संस्थाचालकांशी झालेल्या चर्चेचून कोरोनाचे नियम पाळून जिल्ह्यातील सर्व इंग्रजी शाळा 17 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीदेखील शिक्षक संघ, मेसा, संस्थाचालक महामंडळ आदी संघटनांनी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांकडे शाळा सुरु करण्यासाठी निवेदन दिलेले होते. संस्थाचालक, पालक आणि शिक्षकांच्या समन्वयातून 50 टक्के उपस्थितीने शाळा सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. मात्र मेस्टा संघटनेने एक पाऊल पुढे टाकत, आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल, मात्र सोमवारपासून इंग्रजी शाळा सुरु करणारच, अशी भूमिका घेतली आहे.

मेस्टाच्या अध्यक्षांचं म्हणणं काय?

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, जगभरात कुठेही ओमिक्रॉन विषाणूमुळे किंवा कोरोनामुळे विद्यार्थ्याचा बळी गेलेला नाहीये. विद्यार्थ्यांमधील प्रतिकार शक्ती चांगली असते. विद्यार्थ्यांना कोरोनाचा धोका नाही. आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत. उर्वरीत वर्गांसाठीही शासनाने दिलेले सर्व नियम पाळून आम्ही शाळा भरवत आहोत. त्यामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय अयोग्य आहे. आम्हाला तुमच्याशी संघर्ष करायचा नाहीये. पण सोमवारपर्यंत यासंदर्भात काही निर्णय फिरवला नाही तर आम्हाला नाइलाजानं सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा सुरु कराव्या लागतील. आम्ही कडक नियम पाळू, मात्र शाळा सुरु ठेवू, एवढीच विनंती मी शासनाला करू इच्छितो.

इतर बातम्या-

Prasad Oak | फालतू लोकांकडे दुर्लक्षच कर, प्रसाद ओकचा बायकोला सल्ला, नेमकं झालं काय?

TET Exam : टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांवर नवं संकट, पगार थांबवण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना, मुख्याध्यापकांना इशारा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें