Prasad Oak | फालतू लोकांकडे दुर्लक्षच कर, प्रसाद ओकचा बायकोला सल्ला, नेमकं झालं काय?

दिग्दर्शित, अभिनेता आणि गायक अशा अनेक भूमिका साकारणारे प्रसिध्द व्यक्तीमहत्व प्रसाद ओक (Prasad Oak) नेहमीच चर्चेच असतात. प्रसाद ओक सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात देखील राहतात.

Prasad Oak | फालतू लोकांकडे दुर्लक्षच कर, प्रसाद ओकचा बायकोला सल्ला, नेमकं झालं काय?
प्रसाद ओक यांची पोस्ट व्हायरल

मुंबई : दिग्दर्शित, अभिनेता आणि गायक अशा अनेक भूमिका साकारणारे प्रसिध्द व्यक्तीमहत्व प्रसाद ओक (Prasad Oak) नेहमीच चर्चेच असतात. प्रसाद ओक सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. प्रसाद ओक यांच्या काही पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय देखील ठरतात. सध्या प्रसाद ओक यांची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यांनी ही पोस्ट खास त्यांच्या बायकोसाठी लिहिली आहे.

प्रसाद ओक यांची बायको मंजिरी ओक या एक उद्योजिका आहेत. सोशल मिडियावर विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करून मंजिरी छोट्या उद्योजकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या याच कामाची पावती त्यांना मिळाली आहे. विशेष म्हणजे चक्क एका नथीला त्यांचे नाव देण्यात आले आहे आणि त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावरच प्रसाद ओक यांनी एक विशेष पोस्ट शेअर करून आपल्या बायकोचे काैतुक केले आहे. मात्र, फालतू लोकांकडे दुर्लक्षच कर असा एक खास संदेश ही पोस्टच्या माध्यमातून बायकोला देण्याचा प्रयत्न प्रसाद ओक यांनी केला आहे.

प्रसाद ओक यांनी पोस्टमध्टे म्हटंले आहे की, आज प्रचंड अभिमान वाटतोय तुझा. छोट्या छोट्या उद्योजकांना छोटीशी मदत व्हावी या निर्मळ उद्देशानी तू हे कोलॅबोरेशन वगैरे सुरु केलं आहेस. या निरपेक्ष हेतूंचे फळ म्हणूनच कि काय…आज एका “नथी” ला तुझं नाव लागलंय. “मंजिरीनथ” आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी आपल्या पाठीमागे तुझी चेष्टा केली… तुझ्या so called जवळच्या मैत्रिणींपैकी एकीनेही तुझं कधीही कौतुक केलं नाही. पण या सगळ्या गोष्टींना मागे टाकत…या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून तू आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते आहेस याचा खूप अभिमान वाटतोय. खूप खूप खूप प्रेम ❤️❤️❤️❤️❤️ 𝐒𝐎𝐎𝐎𝐎 𝐏𝐑𝐎𝐔𝐃 𝐎𝐅 𝐘𝐎𝐔..!! #love #proud #proudhusband #keepitup #फालतूलोकांकडेदुर्लक्षचकर #godblessyou प्रसाद ओक यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत मंजिरी ओक यांचे काैतुक केले आहे.

संबंधित बातम्या : 

Birthday Special : रामायणाची जादू, प्रभू रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल दिसताक्षणी लोक पाया पडायचे!

स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची ‘कॉफी’ 14 जानेवारीला प्रदर्शित होणार


Published On - 9:27 am, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI