Maharashtrachi Hasya Jatra : हास्यजत्रेच्या विनोदवीरांना मिळाली महानायकांकडून कौतुकाची थाप, अमिताभ बच्चन यांची घेतली भेट!

हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हास्यजत्रेच्या कलाकारांना महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत बघून चाहतेसुद्धा प्रचंड आनंदीत आहेत. (Maharashtrachi Hasya Jatra's comedians on the set of KBC, met superhero Amitabh Bachchan!)

1/6
सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नुकतंच हास्यजत्रेच्या विनोदवीरांनी कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर हजेरी लावली.

2/6
अभिनेता प्रसाद ओकनं सोशल मीडियावर या सुंदर क्षणाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत संपूर्ण टीम महानायक अमिताभ बच्चन यांच्यासी संवाद साधत आहेत.

3/6
प्रसाद ओक यांनी फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘काही काही मित्र आयुष्यात स्वप्नपूर्ती साठीच आलेले असतात...तसाच एक जवळचा मित्र म्हणजे "अमित फाळके". ज्यानी 2009 साली माझं चित्रपट दिग्दर्शनाचं स्वप्न पूर्ण केलं... मला "हाय काय नाय काय" करता आला तो अमित मुळेच. आणि आता आयुष्यातलं अजून एक स्वप्न पूर्ण झालं ते ही त्याच्यामुळेच. ज्याला मी देव मानत आलोय त्याचं दर्शन झालं... प्रत्यक्ष "बच्चन" साहेबांचं...’

4/6
प्रसाद पुढे लिहितात, ‘#महाराष्टाचीहास्यजत्रा हा कार्यक्रम बच्चन साहेब नियमित पाहतात आणि त्यामुळे आमच्या पूर्ण टीम चं कौतुक करण्यासाठी त्यांनीच ही संधी आम्हाला दिली. हास्यजत्रेच्या टीम चा भाग असल्याचा आज प्रचंड अभिमान वाटतोय. मनःपूर्वक आभार "सोनी मराठी" चे आणि खूप खूप खूप प्रेम "अमित फाळके"...!!!’

5/6
हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हास्यजत्रेच्या कलाकारांना महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत बघून चाहतेसुद्धा प्रचंड आनंदीत आहेत.

6/6
यावेळी अमिताभ बच्चन यांनी सर्व विनोदवीरांचं कौतुकही केलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI