औरंगाबादः अहिराणी भाषा संवर्धनासाठी दरवर्षी विश्व अहिराणी संमेलनाचे (Vishva Ahirani Sammelan) आयोजन करण्यात येते. यावर्षी जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेच्या वतीने संमेलन ऑनलाइन पद्धतीने 22, 23 आणि 24 जानेवारी रोजी आयोजित केले असून संमेलनाचे हे दुसरे वर्ष आहे. यापूर्वी हे संमेलन ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे ठरले होते. मात्र कोरोना संसर्गाचा वेग आणि जिल्हा प्रशासनाने आखून दिलेले नियम पाहता हे संमेलन ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल, असा निर्णय संमेलनासाठी आयोजित बैठकीत घेण्यात आला.