Video : लाख मिळतील, पण तुझ्यासारखी तूच..! वधूला पाहून वराला कोसळलं रडू, नंतर हात धरून मनसोक्त केला डान्स

Video : लाख मिळतील, पण तुझ्यासारखी तूच..! वधूला पाहून वराला कोसळलं रडू, नंतर हात धरून मनसोक्त केला डान्स
लग्न, वधू-वर

जेव्हाही वधू-वरांशी संबंधित व्हिडिओ शेअर केला जातो, तेव्हा तो लगेच व्हायरल होतो. या व्हिडिओमध्ये वधूला पाहून वर रडताना दिसतोय. पण हे दुःखाचे अश्रू नसून आनंदाचे आहेत.

प्रदीप गरड

|

Jan 18, 2022 | 12:22 PM

लग्ना(Wedding)दरम्यान वधू-वर हा चर्चेचा विषय असतो. इंटरनेटवर लग्न आणि वधू-वरांच्या सुंदर क्षणांचे व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया(Social Media)वर त्याच्याशी संबंधित व्हिडिओंचाही पूर आला आहे. सोशल मीडियावर वधू-वरांशी संबंधित कंटेंट लोकांना मोठ्या उत्साहानं पाहायला आवडतं, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. त्यामुळेच जेव्हाही वधू-वरांशी संबंधित व्हिडिओ शेअर केला जातो, तेव्हा तो लगेच व्हायरल होतो. या व्हिडिओमध्ये वधूला पाहून वर रडताना दिसतोय. पण हे दुःखाचे अश्रू नसून आनंदाचे आहेत.

रडतोही आणि नाचतोही…

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर उभे असल्याचं पाहायला मिळतंय. वधूला पाहून वराला खूप आनंद होतो. त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहून तुम्ही त्याच्या आनंदाची कल्पना करू शकता. काही क्षणांनंतर वधू वराच्या डोळ्यांतील अश्रू पुसते. व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता, की वर आपल्या वधूचा हात धरून नाचतदेखील आहे.

इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर शेअर

सध्या हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया यूझर्सना खूप आवडतोय. लाइक्स आणि कमेंट्स करून लोक भरपूर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही witty_wedding नावाच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. काही तासांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर लोकांच्या सुंदर प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.

प्रेमाचा वर्षाव

कमेंट करताना एका यूझरनं लिहिलंय, की असं दिसतं, की दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात. आणखी एका यूझरनं लिहिलंय, हा व्हिडिओ खूप सुंदर आहे. तिसर्‍यानं लिहिलंय, की असे व्हिडिओ खरोखरच खूप चांगले असतात. दोघांची जोडी खूप छान दिसतेय. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये हजारो इमोजीही पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ शेअर करताना, पेजच्या अॅडमिननं कॅप्शनमध्ये लिहिलंय, ते दोघंही खूप गोंडस आणि मोहक आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या जिवलग मित्राशी लग्न करता तेव्हा सर्वात चांगली भावना असते.

Video : खिडकीतून घरात घुसत चोरट्यानं पोलिसांना दाखवला डेमो, यूझर्स म्हणाले…

Viral Video : कोणत्या मित्रांपासून दूर राहावं? जाणून घ्या, फक्त 5 सेकंदांत…

Viral : जुगाडवाली ‘हायटेक’ सायकल, Video पाहून टेस्लाचे इंजिनियर्सही होतील थक्क

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें