शिवसेनेचे मिशन महापालिका सुरू, ध्वज दिवाळी अभियानाला प्रारंभ, पन्नास हजार घरांवर भगवा फडकवणार

औरंगाबादः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (Aurangabad Shivsena) मोठी मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण औरंगाबाद शहरातील जवळपास 50 हजार घरांवर शिवसेनेचा ध्वज फडकवण्याचे ध्वज दिवाळी अभियान आजपासून सुरु झाले. शहरतील अमरप्रीत चौकातून आज या मोहिमेला सुरुवात झाली. या प्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे हे उपस्थिती होते. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे […]

शिवसेनेचे मिशन महापालिका सुरू, ध्वज दिवाळी अभियानाला प्रारंभ, पन्नास हजार घरांवर भगवा  फडकवणार
शिवसेनेच्या ध्वज दिवाळी अभियानाला सुरुवात
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 6:22 PM

औरंगाबादः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (Aurangabad Shivsena) मोठी मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण औरंगाबाद शहरातील जवळपास 50 हजार घरांवर शिवसेनेचा ध्वज फडकवण्याचे ध्वज दिवाळी अभियान आजपासून सुरु झाले. शहरतील अमरप्रीत चौकातून आज या मोहिमेला सुरुवात झाली. या प्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे हे उपस्थिती होते. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.

14 नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शिवसेनेने व्यापक प्रचार मोहीम हाती घेतली असून 1 ते 3 नोव्हेंबरपर्यंत पन्नास हजार घरांवर भगवा फडकवणार आहेत. याद्वारे जागतिक विक्रम करण्याचा त्यांचा निश्चिय आहे. 4 नोव्हेंबर रोजी दिवाळी पहाटेला घाटी रुग्णालय परिसरातील रुग्णांच्या नातेवाईकांना अभ्यंगस्नान घातले जाणार आहे. तसेच 6 नोव्हेंबर रोजी शहरात विविध ठिकाणी आकाश दिव्यांच्या धर्तीवर विकास दीप लावले जाणार आहे. शहरातील विविध विकास कामांची उद्घोषणा या विकासदीपांद्वारे करायची, अशी शिवसेनेची योजना आहे. यानिमित्ताने शहरात 200 विकास दीप लावले जातील. तसेच 7 नोव्हेंबर रोजी महिला आघाडीच्या वतीने कोरोना योद्ध्यांसोबत भाऊबीज साजरी केली जाणार आहे. 14 नोल्हेंबर रोजी तापडिया नाट्य मंदिरात ‘मी सावरकर बोलतोय’ या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे गाजणार?

आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने विविध पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान शहरात गाजत असलेले काही महत्त्वाचे मुद्द्यांवर राजकीय पक्षांसाठी प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. यात 1680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आणि गुंठेवारीसाठी मुदतवाढ असे निर्णय शिवसेनेने उचलून धरले आहेत. संभाजीनगर असा नामकरणाचा वर्षानुवर्षांपासूनचा मुद्दाही या निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो. या मुद्द्यावरून शिवसेना आणि एमआयएम चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र आहे. तसेच शहरातील विकास कामांच्या मुद्द्यांवरून भाजप शिवसेनेला घेरणार असल्याचेही चित्र आहे.

इतर बातम्या- 

औरंगाबादेत मालमत्ता नियमित करण्यासाठी मुदतवाढ, 30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया करण्याची परवानगी

औरंगाबादः युरोलाइफ कंपनी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, 100 कंत्राटी कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.