AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादच्या समस्यांवर तरुणांनी उपाय सुचवावेत, स्मार्ट सिटीतर्फे हॅकेथॉनचे आयोजन, इथे पाठवा तुमच्या कल्पना!

डिझाइन सादर केल्यानंतर 15 फेब्रुवारी पर्यंत यातील उत्तम डिझाइनची निवड केली जाईल. निवडक डिझाइन्सना पुढे 1 महिन्याचा कालावधी देण्यात येईल. या कालावधीत सादर केलेल्या कल्पनेच्या डिझाईनची प्रत्यक्ष अंमबजावणी करून त्याचे सादरीकरण करणे अनिवार्य आहे.

औरंगाबादच्या समस्यांवर तरुणांनी उपाय सुचवावेत, स्मार्ट सिटीतर्फे हॅकेथॉनचे आयोजन, इथे पाठवा तुमच्या कल्पना!
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 3:00 AM
Share

औरंगबाादः शहरातील पाणीपुरवठा, पार्किंगची समस्या, आरोग्य यंत्रणेच्या समस्यांवर तरुणाईने तंत्रज्ञानाच्या ( New Technology ) माध्यमातून उपाय शोधावा आणि त्यांची नव कल्पना महापालिकेला ( Aurangabad municipal Corporation) पाठवावी, असे आवाहन स्मार्टसिटी तर्फे करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी मिशन तर्फे आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत ओपन डाटा वीक साजरा केला जात आहे. याच औचित्यावर औरंगाबाद स्मार्ट सिटीने ‘स्मार्ट औरंगाबाद हॅकॅथॉन’  (Smart Aurangabad Hackathon ) चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील जागृत नागरिकांनी आपल्या सूचना आणि कल्पनांचे डिझाइन पीडीएफ स्वरुपात पाठवण्याचे आवाहन स्मार्ट सिटीतर्फे करण्यात आले आहे.

ओपन डाटा वीकचे आयोजन

भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी देशभरात आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्त स्मार्ट सिटी मिशनतर्फे ओपन डाटा वीकचे आयोजन करण्यात आले आहे. हा वीक साजरा करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी ने ‘स्मार्ट औरंगाबाद हॅकेथॉन’ चे आयोजन केले आहे. शहरातील पाणी पुरवठा, पार्किंग या समस्या सोडवण्यासाठी, कोव्हीड आणि आरोग्यसेवा, प्रशासन कार्यक्षमता वाढवण्यासाठी, सरकारी संस्थांमधील समन्वय साधण्यासाठी आणि युवा वर्गाला जोडण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान अधिष्ठित कल्पना अपेक्षित आहेत. यासाठी 31 जानेवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत तुमच्या कल्पनेच्या डिझाइनचे दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे. डिझाइन सादर केल्यानंतर 15 फेब्रुवारी पर्यंत यातील उत्तम डिझाइनची निवड केली जाईल. निवडक डिझाइन्सना पुढे 1 महिन्याचा कालावधी देण्यात येईल. या कालावधीत सादर केलेल्या कल्पनेच्या डिझाईनची प्रत्यक्ष अंमबजावणी करून त्याचे सादरीकरण करणे अनिवार्य आहे.

आकर्षक पारितोषिकही देणार

या हॅकेथॉनसाठी पारितोषिक देखील देण्यात येणार आहेत. जे डिझाईन सर्वोत्तम आणि कार्यक्षम असेल, त्यांना अनुक्रमे पुढील क्रमानुसार पारितोषिक दिले जाईल. प्रथम पारितोषिक 15 हजार रोख, द्वितीय पारितोषिक 10 हजार रोख, तृतीय पारितोषिक 5 हजार रोख

  • हॅकॅथॉनसाठी नियम व अटी
  •  डिझाईन iOS आणि अँड्रॉइड वापरासाठी सुलभ असावे.
  • डिझाईन सादरीकरण pdf स्वरूपात असावे.
  • 15 फेब्रुवारी पर्यंत’उत्तम डिझाईन निवडून विजेत्याला प्रमाणपत्र देण्यात येईल.
  • डिझाईन पूर्ण विकसित झाल्यानंतर पारितोषिक देण्यात येईल.
  • निवड झाल्यानंतर 15 मार्चपर्यंत मुळ नमुना (प्रोटोटाइप) तयार करून सादरीकरण करणे आवश्यक असेल . तुमची कल्पना पूर्णतः गोपनीय राहील.

इच्छुक उमेदवारांनी त्यांचे डिझाइन सोल्यूशन्स hq@aurangabadsmartcity.in वर पाठवावेत, असे आवाहन स्मार्ट सिटीतर्फे करण्यात आले आहे.

इतर बातम्या-

Pune Crime | भ्रष्टाचार, लाचखोरीनंतर आता ‘या’ गंभीर गुन्ह्यांमुळे पोलीसदल बदनाम ; तीन वर्षात पोलिसांवरील गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी आलीसमोर

मोठी बातमी | औरंगाबादेत अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंना आणखी एक झटका, सोयगावात भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.