चांगली बातमी! वैजापूर नगरपालिकेला पाच कोटींचे बक्षीस! स्वच्छ सर्वेक्षण 2021 अभियानाअंतर्गत कौतुकास्पद कामगिरी

औरंगबााद विभागातून वैजापूर व इतर दोन नगरपालिकांना हा बहुमान मिळाला आहे. याआधी वैजापूर पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत 20.50 कोटी रुपयांचा निधी बक्षीस स्वरुपात मिळाला आहे.

चांगली बातमी! वैजापूर नगरपालिकेला पाच कोटींचे बक्षीस! स्वच्छ सर्वेक्षण 2021 अभियानाअंतर्गत कौतुकास्पद कामगिरी
प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबादः वैजापूर नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 या अभियानाअंतर्गत राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे केंद्र सरकारतर्फे पालिकेला गौरविण्यात आलं आहे. पश्चिम विभागातून पालिकेने 22 वा क्रमांक पटकावला असून नगरपालिकेला तब्बल पाच कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीस शहर विकास मंत्रालयाच्या मानांकनाप्रमामे प्रेरक दौरा स्पर्धेत वैजापूर नगरपालिकेने सुवर्णस्थान मिळवले आहे. तर स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत सलग पाचव्यांदा हे बक्षीस मिळाले आहे.

नगरपालिकेचे हे सामूहिक यशः शिल्पा परदेशी

वैजापूर पालिकेला मिळालेले हे यश शहरातील नगरसेवक, अधिकारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे, यापुढील काळातही सातत्याने असे उपक्रम राबवले जातील, अशी प्रतिक्रिया नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी दिली. तसेच भविष्यात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन यात उल्लेखनीय काम करून प्रथम स्थानी येण्याचा प्रयत्न राहील, असेही त्या म्हणाल्या.

स्वच्छता अभियानात मोलाची कामगिरी

औरंगबााद विभागातून वैजापूर व इतर दोन नगरपालिकांना हा बहुमान मिळाला आहे. याआधी वैजापूर पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत 20.50 कोटी रुपयांचा निधी बक्षीस स्वरुपात मिळाला आहे. नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान, मुख्याधिकारी भागवत बिघोत, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक, अधिकारी व स्वच्छता कर्मचारी व नागरिकांनी हे अभियान यशस्वी केले.

इतर बातम्या-

डेल्टापेक्षा ओमिक्रॉन तब्बल 6 पट बलशाली, त्याची कोणती आहेत लक्षणे, घ्या जाणून…

Devendra Fadnavis : ‘आम्ही पाडणार नाही, हे महाविकास आघाडी सरकार अंतर्विरोधानेच पडेल’, देवेंद्र फडणवीसांचा दावा


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI