Devendra Fadnavis : ‘आम्ही पाडणार नाही, हे महाविकास आघाडी सरकार अंतर्विरोधानेच पडेल’, देवेंद्र फडणवीसांचा दावा

प्रकाश जावडेकरांपासून अमृता फडणवीसांपर्यंत अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. तर अजित पवार, संजय राऊत, नवाब मलिक आदींनी भाजपवर पलटवार केला. अशावेळी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सरकार पाडणार नाही, हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असा दावा केला आहे.

Devendra Fadnavis : 'आम्ही पाडणार नाही, हे महाविकास आघाडी सरकार अंतर्विरोधानेच पडेल', देवेंद्र फडणवीसांचा दावा
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 2:25 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला रविवारी दोन वर्षे पूर्ण झाली. अशावेळी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये जोरदार टीकाटीप्पणी सुरु झालीय. प्रकाश जावडेकरांपासून अमृता फडणवीसांपर्यंत अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. तर अजित पवार, संजय राऊत, नवाब मलिक आदींनी भाजपवर पलटवार केला. अशावेळी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सरकार पाडणार नाही, हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असा दावा केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘भारताचा राजकीय इतिहास पाहिला तर अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ती अंतर्विरोधाने पडतात. जेव्हा सरकार अंतर्विरोधाने पडतात त्यावेळी आज पडेल की उद्या पडेल हे सांगता येत नाही. जेव्हा सरकार सर्वात मजबूत आहे असं वाटतं तेव्हाच ते पडतं. जेव्हा आता पडेल असं वाटतं तेव्हा ते टिकतं. त्यामुळे ही अशी सरकारे टिकत नाहीत. ते आपल्या अंतर्विरोधानेच पडेल. पहिल्या दिवशीपासून सांगतोय आम्ही सरकार पाडणार नाही. ज्या दिवशी सरकार पडेल. तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ’.

‘विरोधी पक्ष म्हणून चोख काम करतो त्यामुळे त्यांना चिमटे बसतात’

‘विरोधी पक्ष म्हणून आम्ही विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहोत. जनतेचे प्रश्न मांडत आहोत. पूर आला तरी आम्ही पोहोचतो. अतिवृष्टी झाली तरी आम्ही पोहोचतो, शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही गेलो. चिखलात जाऊन आम्ही त्याचं दुख: बघितलं आहे. एक दिवस आम्ही घरी बसलो नाही. विरोधी पक्षाचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. म्हणूनच सत्तारुढ पक्षाला त्याचे चिमटे बसत आहेत. त्यामुळेच ते बोलत आहेत, असा जोरदार टोलाही फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावलाय.

‘राणे, दरेकर, चंद्रकांतदादा काय म्हणाले त्यांनाच माहिती’

यावेळी फडणवीसांना राणेंच्या मार्चमध्ये सरकार पडेल या वक्तव्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्याबाबत बोलताना राणे काय म्हणाले हे तेच सांगू शकतील. मी तर काही सांगू शकत नाही. माझं स्पष्ट मत आहे की हे सरकार अंतर्विरोधाने पडेल. त्याचबरोबर दरेकर काय म्हणाले, चंद्रकांतदादा काय म्हणाले हे ते कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणाले तेच सांगू शकतात. मी काय म्हणाले ते मी सांगू शकतो, असं फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या :

सरकार आहे पण शासन नाही, केवळ बदल्यांची फॅक्टरी, कोरोना काळातले मृत्यू लपवले; फडणवीसांचा घणाघात

जिल्हा परिषदेची सदस्य संख्या वाढणार, ओमिक्रॉन रोखण्यासाठी विशेष प्लान; मंत्रिमंडळ बैठकीतील चार मोठे निर्णय

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.