BJP : उद्धव ठाकरे अपघाताने झालेले मुख्यमंत्री, महा विश्वासघातकी आघाडी सरकार – जावडेकर

BJP : उद्धव ठाकरे अपघाताने झालेले मुख्यमंत्री, महा विश्वासघातकी आघाडी सरकार - जावडेकर

प्रकाश जावडेकर यांनी उद्धव ठाकरेंना अपघातानं झालेले मुख्यमंत्री म्हणत टीकास्त्र सोडलंय.  राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली, पण केंद्राने केलेली कामेही त्यांनी आपल्या खात्यात मांडली असा आरोपही भाजप खासदार प्रकाश जावडेकरांनी केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Nov 28, 2021 | 3:17 PM

ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कामाचा लेखाजोखा मांडताना भाजप आणि महाविकास आघाडीत जोरदार खडजंगी होताना दिसून येतेय. ठाकरे सरकारच्या दोन वर्षांवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येतेय तर त्याला महाविकास आघाडीतील नेते प्रत्युत्तर देताना दिसून येत आहेत. भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनीही ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कामवार जोरदार टीका केलीय.

ठाकरे अपघातानं झालेले मुख्यमंत्री

प्रकाश जावडेकर यांनी उद्धव ठाकरेंना अपघातानं झालेले मुख्यमंत्री म्हणत टीकास्त्र सोडलंय.  राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली, पण केंद्राने केलेली कामेही त्यांनी आपल्या खात्यात मांडली असा आरोपही भाजप खासदार प्रकाश जावडेकरांनी केला आहे. हे सरकार संधीसाधू सरकार असल्याचा घणाघात जावडेकरांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना जोरदार रंगू लागलाय.

महा विश्वासघातकी आघाडी सरकार

मी नवे नाव देतोय, महा विश्वासघातकी आघाडी सरकार, असं म्हणत जावडेकारांनी ठाकरे सरकारचं पुन्हा नव्यानं नामकरण केलंय. अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले, काही मंत्र्यांनी जावयाला कंत्राट दिलं, काही मंत्र्यांनी दाऊद शी संबंधित मालमत्ता घेतली, असं म्हणत नाव न घेता जावडेकर यांनी अनेक मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. राज्यात भ्रष्टाचार आहे, कायदा सुव्यवस्था नाही. गृहमंत्री 6 महिने फरार होते, आणि आता जेलमध्ये ते गेले, असं कोणतं राज्य आहे ? असा असा सवाल करत जावडेकरांनी सरकारला धारेवर धरलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त गायब होणं, हेही वाईट आहे असंही जावडेकरांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे.

‘आमच्या कामावर अमित शाह समाधानी’, चंद्रकांत पाटलांकडून संघटनात्मक बदलांच्या चर्चेला पूर्णविराम

Shani Amavasya 2021 | शनी देवाची कृपा हवी असेल तर ‘शनी अमावस्येला’ हे उपाय नक्की करा

VIDEO : Sanjay Raut Daughter Wedding | संजय राऊत यांनी केला कन्येच्या संगीत कार्यक्रमात डान्स

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें