Shani Amavasya 2021 | शनी देवाची कृपा हवी असेल तर ‘शनी अमावस्येला’ हे उपाय नक्की करा

ज्योतिषशास्त्रात शनि हा रागीट ग्रह मानला जाते. जर तुमच्या कुंडलीत शनिची वक्रदृष्टी पडली तर मात्र तुमची काही खैर नाही. कुंडलीमध्ये शनीच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनाची दिशा बदलते असे मानले जाते

Shani Amavasya 2021 | शनी देवाची कृपा हवी असेल तर 'शनी अमावस्येला' हे उपाय नक्की करा
shani

मुंबई : ज्योतिषशास्त्रात शनी हा रागीट ग्रह मानला जाते. जर तुमच्या कुंडलीत शनीची वक्रदृष्टी पडली तर मात्र तुमची काही खैर नाही. कुंडलीमध्ये शनीच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनाची दिशा बदलते असे मानले जाते. आपल्या कुंडलीत शनीची क्रूर दृष्टी किंवा अशुभ परिणामांचा विचार करताच लोक घाबरू लागतात. पुराणात पृथ्वीवरील देवही शनीच्या शिक्षेपासून वाचू शकला नाही. चला जाणून घेऊया शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी आणि त्याची कृपा मिळविण्यासाठीचे उपाय.

ज्योतिषशास्त्रात शनीची साडेसाती ही अत्यंत क्लेशकारक मानली गेली आहे, परंतु अशुभ किंवा अन्यथा पापकर्म भोगल्यानंतर सुख नक्की येते. पण सुख आणि अनंदाच्या समिकरणांमध्ये लोकांनी शनी देवाशी जोडले आहे. तुमच्या आयुष्यात शनीची साडेसती चालू असेल तर तुम्ही घाबरू नका, तर चांगले कर्म करत जा, कारण ते तुमच्यासाठी चांगले असते.

  • या दिवसांत तुमच्या राशीवर शनीची साडे सती चालू असेल, तर त्याच्याशी संबंधित त्रास दूर करण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता.
  • शनीदेवाचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी वैदिक किंवा तांत्रिक मंत्रांसह पाठ करा.
  • शनीचा दोष टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अधर्म, खोटी साक्ष देणे इत्यादी टाळा
  • दर शनिवारी शनिदेवाची आराधना करा
  • शनीशी संबंधित दोष दूर करण्यासाठी प्रत्येक शनिवारी व्रत ठेवा आणि शनीशी संबंधित वस्तू अपंग व्यक्तीला दान करा.
  • पितळेच्या भांड्यात आपली सावली पाहून ते तेल दान करावे.
  • गिरणीत गहू, उडीद, हरभरा, सातू, तीळ अशा पाच गोष्टी बारीक करून गोळ्या बनवाव्यात आणि माशांना खायला द्याव्यात.
  • शनिवारी उडीद, हरभरा, तिळाचे तेल दान करा.

संबंधित बातम्या :

Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील

PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी


Published On - 3:00 pm, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI