पूरात वाहून गेला बाइकस्वार, बचावासाठी गाव एकवटला, औरंगाबादच्या गारज गावातील घटना

औरंगाबादेतील गारज गावात घडलेल्या या घटनेत गावकऱ्यांनी या बाइकस्वाराला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. अखेर त्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबी मागवण्यात आले.

पूरात वाहून गेला बाइकस्वार, बचावासाठी गाव एकवटला, औरंगाबादच्या गारज गावातील घटना
पूलावरून वाहून गेलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील गारज गाव एकवटला
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 4:29 PM

औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहर आणि परिसराला मुसळधार पावसाचा (Heavy rain in Aurangabad) फटका बसत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या पूलांवरून पाणी पाहत आहे. औरंगाबादेतील गारज गावातही (Garaj village) अशीच एक घटना घडली. पूलावरून वाहणाऱ्या पाण्यातून बाईक नेताना एक बाईकस्वार पाण्यात वाहून गेला. मात्र त्याला वाचवण्यासाठी अवघा गाव एकवटला आणि जेसीबीच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात (Rescue operation ) आले.

बाईक काढण्यासाठी अख्खा गाव एकवटला

सततच्या अतिवृष्टीमुळे ढेकू नदीवरील पूलावरून पाणी जात आहे. जीवनावश्यक कामे करण्यासाठी नागरिकांना येथून ये-जा करावी लागते. शुक्रवारी असाच एक बाइकस्वार या पुलावरून जात होता. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे बाइकसहीत तो पाण्यात पडला. हे गारज गावातील अनेक नागरिक त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र बाइकमध्ये अडकल्याने या नागरिकाला बाहेर काढता येत नव्हते.

अखेर जेसीबी मागवला…

औरंगाबादेतील गारज गावात घडलेल्या या घटनेत गावकऱ्यांनी या बाइकस्वाराला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. अखेर त्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबी मागवण्यात आला. जेसीबीच्या मदतीने या बाइकस्वाराला बाहेर काढण्यात आले. सुदैवाने त्याचा जीव वाचला. सध्या औरंगाबाद शहर आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा असून, . गरज असली तरच बाहेर पडा, असे प्रशासनाचे आदेश आहेत, मात्र ज्यांची रोजीरोटीच गावाबाहेर पडल्याशिवाय मिळत नाही, अशांनी काय करायचे हादेखील प्रश्न अनुत्तरीत आहे. यामुळेच ग्रामीण भागात असे प्रकार घडत आहेत.

फुलंब्रीत कर्णबधीर आजीची तीन नातवंड बुडाली

वाणेगावच्या मुक्ताबाई रामराव शेजवळ या वृद्ध महिला 6 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या नातवांसह गिरजा नदीच्या किनाऱ्यावर कपडे धुण्यासाठी आल्या होत्या. खरंतर मुक्ताबाई या कर्णबधीर आहेत. त्या कपडे धुत होत्या. यावेळी त्यांचा नातू निलेश हा त्याचे दोन मित्र गौरव पाचवणे (वय 6) आणि विजू पाचवणे (वय 11) यांच्यासोबत नदी पात्रात खेळत होते. यावेळी नदी पात्रातले पाणी वाढले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तीनही मुलं बुडाली.

इतर बातम्या- 

Railway: नातेवाईकांना सोडायला जाताय? आता प्लॅटफॉर्म तिकिट काढाच, दर 30 चे 10 रुपयांवर आले

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.