ह्रदयद्रावक, ऐकायला न येणाऱ्या आजीसमोर तीन भावंडं बुडाली, दोन दिवसानंतरही तिसऱ्याचा शोध सुरुच

एका मुलाचा मृतदेह नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आजी कर्णबधिर असल्यामुळे तिला समजेपर्यंत वेळ गेल्याचा अंदाज आहे.

ह्रदयद्रावक, ऐकायला न येणाऱ्या आजीसमोर तीन भावंडं बुडाली, दोन दिवसानंतरही तिसऱ्याचा शोध सुरुच
औरंगाबादमध्ये तिघा नातवंडांचा बुडून मृत्यू

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील वानेगावात गिरीजा नदीत तीन मुलं वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मात्र अजूनही एका मुलाचा मृतदेह सापडलेला नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे. एका मुलाचा मृतदेह नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आजी कर्णबधिर असल्यामुळे तिला समजेपर्यंत वेळ गेल्याचा अंदाज आहे.

नेमकं काय घडलं?

वाणेगावच्या मुक्ताबाई रामराव शेजवळ या वृद्ध महिला 6 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या नातवांसह गिरजा नदीच्या किनाऱ्यावर कपडे धुण्यासाठी आल्या होत्या. खरंतर मुक्ताबाई या कर्णबधीर आहेत. त्या कपडे धुत होत्या. यावेळी त्यांचा नातू निलेश हा त्याचे दोन मित्र गौरव पाचवणे (वय 6) आणि विजू पाचवणे (वय 11) यांच्यासोबत नदी पात्रात खेळत होते. यावेळी नदी पात्रातले पाणी वाढले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तीनही मुलं बुडाली.

आजीची गावकऱ्यांकडे मदतीची हाक

संबंधित घटना जेव्हा आजीच्या लक्षात आली तेव्हा तिने मदतीसाठी गावात धाव घेतली. यावेळी काही गावकरी आजीच्या जवळ आली. त्यांनी आजी काय म्हणतेय ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सगळे नदीच्या दिशेला पळत सुटली. काही गावकऱ्यांनी तातडीने पाण्यात उडी मारत मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत उशिर झाला होता. तीनही मुलांचा त्यावेळी शोध लागत नव्हता.

दोन सख्ख्या भावांचा मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरु

अखेर संबंधित घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दालाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरु केलं. बराच वेळ शोध घेतल्यानंतर गौरव पाचवणे आणि विजू पाचवणे या दोन्ही सख्ख्या भावांचे मृतदेह जवानांच्या हाती लागला. अग्निशमन दलाचे जवान निलेश शेजवळ या मुलाचा शोध घेत आहेत.

दरम्यान, गिरजा नदीच्या किनाऱ्यावर ग्रामस्थांनी गर्दी केली. मृतक मुलांच्या आई-वडिलांनी यावेळी टाहो फोडला. त्यांचा आक्रोश बघून गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले. मुक्ताबाई खरंतर तीनही मुलांना सोबत घेऊन जात नव्हत्या. पण मुलं हट्ट करत असल्याने ते त्यांना सोबत घेऊन गेल्या.

हेही वाचा :

माकडामुळे माणसाचा मृत्यू, पाच लहान मुलांसह-पत्नी पोरकी, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

छपरींची एवढी हिम्मत की रस्त्यानं पोरी-बाळींना चालणं मुश्किल, संतापजनक व्हिडीओ व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI