AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादः 25 जवानांचे 5 तास शर्थीचे प्रयत्न, करमाडच्या तलावातली कार अखेर बाहेर, तिघांचा मृत्यू

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड परिसरातील (Karmad, Aurangabad) कोल्हापुरी बंधाऱ्यात भरधाव वेगाने आलेली कार पडली होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना (Car Accident) घडली. तेव्हापासून अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि पोलीस ही कार आणि त्यातील प्रवाशांचा शोध घेत होते. तलाव खूप खोल असल्याने कर्मचाऱ्यांना बचावकार्य करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर पाच तासांच्या परिश्रमानंतर कार आणि त्यातील […]

औरंगाबादः 25 जवानांचे 5 तास शर्थीचे प्रयत्न, करमाडच्या तलावातली कार अखेर बाहेर, तिघांचा मृत्यू
करमाड येथे चार वाजता तलावात पडलेली कार पाच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बाहेर काढली
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 13, 2021 | 10:41 AM
Share

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड परिसरातील (Karmad, Aurangabad) कोल्हापुरी बंधाऱ्यात भरधाव वेगाने आलेली कार पडली होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना (Car Accident) घडली. तेव्हापासून अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि पोलीस ही कार आणि त्यातील प्रवाशांचा शोध घेत होते. तलाव खूप खोल असल्याने कर्मचाऱ्यांना बचावकार्य करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर पाच तासांच्या परिश्रमानंतर कार आणि त्यातील प्रवासी कर्मचाऱ्यांच्या हाती लागले. मात्र यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.

दोन महिला व एका पुरुषाचा मृत्यू

करमाडच्या जवळच असलेल्या जडगाव येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तब्बल पाच तासाच्या अथक परिश्रमानंतर हे चारचाकी वाहन बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. या अपघातात दोन महिला आणि एक पुरुष असा तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव असलेलं हे चारचाकी वाहन नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याशेजारी असलेल्या तलावात कोसळले होते, तलावातील पाणी खोल असल्यामुळे गाडीतील तिन्ही प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला, पाणी खोल असल्यामुळे गाडी बाहेर काढण्यासाठी तब्बल 5 तासांचा वेळ लागला.

शहरातील गजानन नगरातील प्रवासी

औरंगाबाद तालुक्यातील शेलुद येथील असून सध्या ते शहरातील गजानन नगर येथेच रहात होते. कारमधील व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे आहेत.. वैजीनाथ उमाजी चौधरी – 52 मंगल वैजीनाथ चौधरी – 45 सुकन्या मधुर चौधरी – 22

 सासू-सासरे, सुनेचा मृत्यू 

मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास वैजिनाथ चौधरी हे  कारने आपली पत्नी व सुनेला घेऊन दर्शनासाठी एकलहरा देवीच्या दर्शनासाठी जात होते. जडगाव येथील नातेवाईक राजेंद्र वाघ यांना भेटून पुढे एकलहरा येथे जाण्याचा बेत ठरवला. लाडगावहून जात असताना जडगावच्या कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ चौधरी यांचा कारवरील ताबा सुटून कार बंधाऱ्यात पडली. त्यांनी मोबाइलद्वारे नातेवाइकांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांचा मोबाइल बंद पडला. या बंधाऱ्यात जवळपास 30-40 फूट पाणी खोल असल्याने कारचा शोध घेण्यास अडचण येत होती. या वेळी अग्निशमन दलाचे 25 जवान व गावकऱ्यांनी पाच तास अथक प्रयत्न करून सायंकाळी पावणेसात वाजता क्रेनच्या मदतीने कार पाण्याबाहेर काढली.

इतर बातम्या-

औरंगाबाद-पुणेदरम्यान लवकरच सहापदरी ‘एक्सप्रेस वे’, नितीन गडकरींसमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत सादरीकरण

तिरुपतीचे बनावट पास देणाऱ्या भामट्याला बेड्या, 61भाविक दर्शनाविनाच परतले होते औरंगाबादेत

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या