AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद दूध उत्पादक संघाच्या निवडणूक प्रक्रियेला वेग, महाविकास आघाडी एकत्र लढणार का? राजकीय वर्तुळाला उत्सुकता

जिल्ह्यात सर्वाधिक दूध उत्पादक संस्था फुलंब्री आणि औरंगाबाद तालुक्यात आहेत. त्यामुळे आ. हरिभाऊ बागडे विरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद दूध उत्पादक संघाच्या निवडणूक प्रक्रियेला वेग, महाविकास आघाडी एकत्र लढणार का? राजकीय वर्तुळाला उत्सुकता
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 4:48 PM
Share

औरंगाबादः जिल्ह्यातील दूध उत्पादक सहकारी संघाच्या (Aurangabad Milk Producers co-operative union) निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. काही दिवसात निवडणूक प्रक्रियेला सुरुवातही होणार आहे. या निवडणुकीत सर्वपक्षीयांच्या एकमताने संचालक निवडणार की जिल्हा बँकेच्या (District Bank Election) निवडणुकीची पुनरावृत्ती होणार, याबद्दलची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. दरम्यान गाव पातळीवरील दूध उत्पादक संस्थांकडून मतदान प्रतिनिधींचे ठराव मागवण्यात आले असून, त्याची मुदत 9 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यानंतर मतदार (Voter’s list) यादी प्रसिद्ध होऊन निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

सध्या भाजपकडे अध्यक्ष पद, तर सेनेकडे उपाध्यक्ष पद

सध्या विधानसभेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नेते आमदार हरिभाऊ बागडे हे दूध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष आहेत. तर शिवसेनेचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचे कट्टर समर्थक नंदलाल काळे हे संघाच्या उपाध्यक्ष पदी आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील 349 दूध उत्पादक सोसायट्यांचे प्रतिनिधी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. सर्वाधिक दूध उत्पादक संस्था फुलंब्री, औरंगाबाद आणि सिल्लोड तालुक्यात आहेत. नऊ तालुक्यांतून दूध उत्पादक सोसायट्यांच्या तेवढ्याच जागा असतील. याशिवाय ओबीसी, महिला, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अशा 14 संचालकांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.

महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष

राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीतही हे पक्ष एकत्र लढणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दूध उत्पादक संस्था फुलंब्री आणि औरंगाबाद तालुक्यात आहेत. त्यामुळे आ. हरिभाऊ बागडे विरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे असा सामना रंगणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपमधील बंडखोरी व डॉ. काळे यांच्या पॅनलमुळे चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे हरिभाऊ बागडे यांना पराभवालाचा धक्का सहन करावा लागला होता. या निवडणुकीत रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष दूध संघाच्या निवडणुकीत एकत्र येतील का, याकडेच सगळ्यांचे लक्ष आहे.

इतर बातम्या-

औरंगाबादः 41 वर्षांचा वडिलांचा लढा मुलाने जिंकला, भरपाई 3 वरून 23 लाख रुपयांवर, जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर आली होती जप्ती

Aurangabad crime: पेट्रोल पंपावरून पावणेचार लाख रुपयांची बॅग पळवली, व्यापाऱ्याची पोलिसात धाव

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.