AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद-पैठण रोडच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा, मंत्री भुमरे यांची गडकरींशी चर्चा, डिसेंबरमध्ये भूसंपादन

या रस्त्यासाठी 1900 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या रस्त्याची 20 मीटर रुंदी असणार आहे. तीन ठिकाणी बायपास असणार असून तीन ठिकाणी उड्डाणपूल असणार आहेत.

औरंगाबाद-पैठण रोडच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा, मंत्री भुमरे यांची गडकरींशी चर्चा, डिसेंबरमध्ये भूसंपादन
औरंगाबाद-पैठण रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 12:40 PM
Share

औरंगाबाद: पैठण ते औरंगाबाद (Paithan- Aurangabad Road) या रस्त्याच्या चौपदीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळलेला आहे. चार वेळा उद्घाटन होऊनही राजकीय कुरघोडींमध्ये अडकलेल्या या रस्त्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचे चिन्ह आहेत. पैठण-औरंगाबाद रोडचा डीपीआर तयार झाला असून लवकर भूसंपादन होणार आहे. रोजगार व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची शनिवारी भेट घेतली. त्यानंतर पैठण-औरंगाबाद चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.

तीन ठिकाणी बायपास, तीन उड्डाणपूल

या रस्त्यासाठी 1900 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या रस्त्याची 20 मीटर रुंदी असणार आहे. तीन ठिकाणी बायपास असणार असून तीन ठिकाणी उड्डाणपूल असणार आहेत. ढोरकीन, बिडकीन व आणखी एक बायपास असणार आहे. यात तीन ठिकाणी उडाणपूल यासाठी असणार आहेत. यासाठी 118 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी 900कोटी रुपये तर रोडसाठी एक हजार कोटींची तरतूद होणार आहे. या चौपदरीकरणाचा डीपीआर तयार करण्यात आला असून मार्चमध्ये टेंडर निघणार आहे. या डिसेंबरमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू होइल, अशी माहिती नॅशनल हायवेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्गात या रोडचा समावेश

पैठण-औरंगाबाद चौपदरीकरणाचा विषय रेंगाळत असल्याने व चार वेळा उद्घाटन होऊन देखील पुढे काय हा प्रश्न मात्र आतापर्यंत राजकारणचा विषय झाला. मात्र, आता पैठण-औरंगाबाद रोड हा राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट झाल्याने आता चौपदरीकरण होणार आहे. यात 44 किमीच्या कामाला साधारणपणे डिसेंबर 2021 ला सुरुवात होणार आहे. ढोरकीन, बिडकीन व आणखी एक बायपास असणार आहे. यात तीन ठिकाणी उडाणपूल यासाठी असणार आहेत. यासाठी रोजगार व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सतत पाठपुरावा केला असल्याने आता पैठण ते औरंगाबाद मार्गाच्या चौपदरीकरणाच्या पाठपुराव्यासाठी स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी देखील विशेष लक्ष दिले असल्याने आता चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

उद्योगधंदे व सामान्यांसाठी महत्त्वाचा रस्ता

औरंगाबाद ते पैठण महामार्गाचे चौपदरीकरण झाले तर दळणवळणासाठी व उद्योग धंद्यांसाठी फायदेशीर राहील. तसेच या रस्त्याचे अंतर 50 किलोमीटरचे आहे. मात्र खड्डे आणि कच्च्या रस्त्यापायी हे अंतर पार करण्यासाठी एक तास लागतो. चौपदीकरणाचे काम झाल्यावर हे अंतर अर्ध्या तासातच पार करता येईल. यासोबतच पैठण मार्गे शेवगाव, नगरसाठी हा सोयीचा मार्ग ठरेल.

पैठण मार्गाचे काम का रखडलेॽ

राजकीय पक्षांतील आरोप-प्रत्यारोप व वादापायी औरंगाबाद ते पैठण या महामार्गाचे काम रखडले होते. या मार्गाच्या चौपदरीकरणाचे आतापर्यंत चार वेळा उद्घाटन झाले. यात प्रत्येक वेळी विविध सत्तेत असणाऱ्या पक्षांच्या मंत्र्यांनी किंवा आमदार-खासदारांनी उद्घाटनांची औपचारिकता पूर्ण करत जनतेची दिशाभूल केली. आता थेट मंत्र्यांनीच पाठपुरावा केल्याने वाहतूकदारांसह सामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

इतर बातम्या- 

Aurangabad: जिल्ह्यात 130 कोटींच्या निधीचा वापर, 365 कोटींची कामे अपेक्षित, वाचा पालकमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या?

औरंगाबाद जिल्ह्यात टँकरमुक्तीचे संकेत.. भूजल पातळीत 2 मीटर वाढ, पैठणमध्ये सर्वाधिक 4.5 मीटरची वाढ 

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.