Aurangabad: फुलंब्रीत ऐन थंडीत राजकारण तापले, निवडणुकांचा धडाका, प्रभाग रचना, आरक्षणाकडे साऱ्यांचे लक्ष!

फुलंब्री तालुक्यात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. कारण आगामी वर्षात तालुक्यात एकापाठोपाठ एक निवडणुकांचे बार उडणार आहेत. पुढील वर्षी येथील जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत.

Aurangabad: फुलंब्रीत ऐन थंडीत राजकारण तापले,  निवडणुकांचा धडाका, प्रभाग रचना, आरक्षणाकडे साऱ्यांचे लक्ष!
प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबादः फुलंब्री तालुक्यात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. कारण आगामी वर्षात तालुक्यात एकापाठोपाठ एक निवडणुकांचे बार उडणार आहेत. पुढील वर्षी येथील जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका या विधानपरिषदेकडे जाण्याचा मार्ग असतो, त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

फुलंब्रीतील राजकीय स्थिती काय?

फुलंब्री तालुक्यात 8 पंचायत समिती सदस्य तर 4 जिल्हा परिषद गट आहेत. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात औरंगाबाद तालुका आणि फुलंब्री तालुका अशा दोन विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश आहे. तालुक्यात जिप व पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी मागील निवडणुकीत भाजपचे तीन जि.प. सदस्य निवडून आले. तसेच काँग्रेस पक्षाचा एक सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मागील जिप आणि पंचायत समिती निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.

वडोदबाजार व गणोरी जिप निवडणुकीकडे लक्ष

वडोदबाजार व गणोरी जिल्हा परिषद निवडणुकीकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत अनुराधा चव्हाण सर्वाधिक मताने निवडून आल्या होत्या. तर वडोदबाजार जिप गटात काँग्रेसकडून निवडून आलेले व सध्या शिवसेनेत असलेले किशोर बलांडे हे बांधकाम सभापती आहेत. हे दोघेही विधानसभेसाठी पक्षाकडून दावेदार आहेत. या दोन गटात कशी प्रभाग रचना होते, आरक्षण काय निघते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्थानिक पातळीवर कुणाचे वर्चस्व?

फुलंब्री तालुक्यात भाजपचे तीन जिप सदस्य, सात पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत. तर फुलंब्री नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे हरिभाऊ बागडे हे निवडून आले आहेत. तर काँग्रेस पक्षाच्या ताब्यातील बाजार समिती राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपचे जिप-पंस नगरपंचायतीवर सध्या वर्चस्व आहे.

इतर बातम्या-

CDS Bipin Rawat Helicopter crash: बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर नीलगिरीच्या डोंगरात कुठे आणि कसं कोसळलं?

…तर महानगरपालिका निवडणुकांतही ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, चंद्रकांत पाटलांना भीती


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI