AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिल्लोड, सोयगाव तालुक्यांतील विजेची समस्या मार्गी लागणार; ऊर्जामंत्र्यांकडून दखल, अधिकाऱ्यांना दिले निर्देश

सिल्लोड व सोयगाव तालुक्यांतील वीजपुरवठ्याशी संबंधित सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले आहेत. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामाची आढावा बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

सिल्लोड, सोयगाव तालुक्यांतील विजेची समस्या मार्गी लागणार; ऊर्जामंत्र्यांकडून दखल, अधिकाऱ्यांना दिले निर्देश
नितीन राऊत यांची बैठक
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 9:16 PM
Share

औरंगाबाद : सिल्लोड (Sillod) व सोयगाव तालुक्यांतील वीजपुरवठ्याशी संबंधित सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी आज दिले आहेत. सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामाची आढावा बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. महावितरणच्या (MSEDCL) स्वतंत्र सिल्लोड विभागाची निर्मिती झाल्यामुळे ग्राहक सेवेत झालेल्या सुधारणेबाबत राऊत व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी समाधान व्यक्त केले आहे. सिल्लोड व सोयगाव तालुक्यांतील कृषिपंप रोहित्रांच्या  क्षमतेत वाढ करावी, नवीन रोहित्र बसवावेत तसेच जीर्ण झालेल्या तारा बदलण्याची मागणी यावेळी  सत्तार यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली. याबाबत बोलताना उपलब्ध निधीतून ही कामे त्वरित करण्यात यावीत तसेच वाढीव निधीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा असे निर्देश ऊर्जामंत्र्यांकडू देण्यात आले आहेत.

वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोहत्साहित करावे

राज्य शासनाच्या कृषी वीज धोरणानुसार कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीतील 33 टक्के रक्कम ग्रामपंचायत स्तरावरच विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांत कृषिपंपांचे वीजबिल भरण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. त्यातून वसूल होणाऱ्या रकमेतून उर्वरित प्रलंबित कामे करावीत. कृषिपंपांच्या प्रलंबित जोडण्या तातडीने द्याव्यात, असे निर्देशही यावेळी ऊर्जामंत्री राऊत यांनी यावेळी दिले आहेत.

समस्या लवकर सुटण्याची अपेक्षा

या बैठकीला उर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे,महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे व मराविम सुत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे उपस्थित होते. तर औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, औरंगाबाद ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली हे आभासी पध्दतीने या बैठकीत सहभागी झाले होते. दरम्यान विज पुरवठ्याशी संबंधित समस्यांची ऊर्जा मंत्र्यांकडून दखल घेण्यात आल्याने दोनही तालुक्यातील समस्या आता मार्गी लागतील असी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Aurangabad politics | उद्यानातील खासदार-आमदारांच्या पाट्या हटणार, मनपा प्रशासकांचे भाजपला आश्वासन

Corona Updates | औरंगाबादेत आजपासून हॉटेलवरील वेळांचे निर्बंध हटले, शहरात आणखी काय काय सुरळीत होणार?

पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात औरंगाबादेत निदर्शने, मुकुंदवाडीतील शिवरायांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसची घोषणाबाजी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.