राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिन्याचा सश्रम कारावास, कारण काय?

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली होती.

राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिन्याचा सश्रम कारावास, कारण काय?
राज्यमंत्री बच्चू कडूImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 4:32 PM

अमरावती: राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांना दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चांदूरबाजार (chandurbazar) प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली होती. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाचा आज निकाल आला असून बच्चू कडू यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे विधानसभा (vidhansabha) सदस्यपद रद्द करा, अशी मागणी याचिकाकर्ते तिरमारे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता बच्चू कडू उच्च न्यायालयात जाण्यार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच कोर्टाने दिलेल्या चुकीच्या निर्णयाचं स्वागत करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी आपल्याला जामीन मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

चुकीच्या निर्णयाचे स्वागत

विधानसभा निवडणूक लढवताना 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते. त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही गंभीर प्रकार नव्हता. मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

राज्य शासनाने आमदारांची एक सोसायटी गठीत करून घरासाठी कर्ज दिले होते. हेच ते घर असून 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जावर या घरासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम आम्ही नोंदवली होती. मात्र घर क्रमांक देण्यास विसरलो होतो. हा संपूर्ण प्रकार अचलपूरला घडला आणि या प्रकरणाची तक्रार चांदूर बाजार येथील व्यक्तीने आसेगाव येथील पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने वचपा काढण्यासाठी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खरं तर न्यायालयाने या प्रकरणात चुकीचा निर्णय दिला आहे, असं ते म्हणाले.

वरच्या न्यायालयात जाऊ

न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्याचे आम्ही स्वागत करत असलो तरी आता आम्हाला जामीन मिळाला असून वरच्या न्यायालयात आम्ही जाणार आहोत. वरच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या:

संजय राऊत तुम्ही फडणवीसांच्या घराबाहेर याच आम्ही बघू, भाजपचं राऊतांना थेट आव्हान

Vaidehi Parashurami : वैदेही परशुरामी झाली ‘गुलाबो’, Weekend mood मधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर

UP Elections | उत्तर प्रदेशात मतदानानंतर गाडीत आढळले EVM, कैराना येथे खळबळ, तपासानंतर काय उघड झालं?

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.